भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य जबावताना भारतीय जवानाला मारहाण करत त्याला सीमेपार ओढत नेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बांगलादेशी तस्करांकडून ही मारहाण झाल्याचं सीमा सुरक्षा दलाकडून सांगण्यात आलं आहे. २ जून रोजी भारत बांगलादेश सीमेवर दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली.
हेही वाचा – UPSC-MPSC : बांगलादेशची निर्मिती कशी झाली? यात भारताची भूमिका काय होती?
एएनाआयने सीमा सुरक्षा दलाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शिपाई भोले २ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास भारत बांगलादेश सीमेवर असलेल्या फेन्सींग गेटवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी बांगलादेशी तस्करांची टोळी बांगलादेशची सीमा ओलांडून त्या ठिकाणी आले. सारखेची तस्करी करण्याचा उद्देशाने त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी या तस्करांनी शिपाई भोले यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, या तस्करांनी शिपाई भोले यांना बांबूने तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच त्यांना ओढत बांगलादेशच्या सीमेपार नेण्याचा प्रयत्न केला. इतंकच नाही, त्यांनी भोले यांच्याकडील रेडिओ सेट आणि रायफस हिसकावले. मात्र, यावेळी काही करून शिपाई भोले त्यांच्या तावडीतून सुटण्यास यशस्वी झाले. या घटनेत शिपाई भोले हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात बांगलादेशच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तीव्र विरोध जाहीर केला आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारत-बांगलादेश यांच्यातील सहकार्याची क्षेत्रे कोणती?
दरम्यान, शिपाई भोले यांच्याकडील रायफल आणि रेडिओ सेट बांगलादेशच्या अधिकाऱ्यांकडून परत देण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना भारत बांगलादेश सीमेवर शांतता राहावी या उद्देशाने आम्ही बांगलादेशबरोबर सहकार्याने काम करू इच्छितो, अशी प्रतिक्रिया सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
