पाच महिन्यांच्या खंडानंतर इस्रोच्या अवकाश मोहिमांना सुरुवात! १२ ऑगस्टला होणार ‘EOS-03’ चं प्रक्षेपण!

करोना काळात खंड पडलेल्या अवकाश मोहिमांना इस्रो पुन्हा सुरुवात करत असून १२ ऑगस्ट रोजी नव्या उपग्रहाचं प्रक्षेपण होणार आहे.

isro launch satellite EOS-03
इस्रो येत्या १२ ऑगस्ट रोजी सॅटेलाईट लाँच करणार!

देशांत कोरोनोची दुसरी लाट ओसरत असून जनजीवन सुरळित सुरु झालं असताना आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो पुनश्च हरिओम म्हणत उपग्रह प्रक्षेपण मोहिमांना सुरुवात करत आहे. येत्या १२ ऑगस्टला इस्त्रो २२६८ किलो वजनाचा EOS-03 हा उपग्रह GSLV-F10 या प्रक्षेपकाद्वारे भूस्थिर कक्षेत पाठवणार आहे.

पहाटे पाच वाजून ४३ मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण नियोजित आहे. या उपग्रहामुळे भारतीय उपखंडातील विविध भागाची २४ तास सुस्पष्ट छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे. पीक लागवडीच्या क्षेत्राबद्दल माहिती घेणे, दुष्काळ-पूर परिस्थीतीवर लक्ष ठेवणे, सागरी क्षेत्र व्यवस्थापन, वातावरणातील धुकं-धुळ याबद्दलची ताजी माहिती, आपातकालीन व्यवस्थापन अशा विविध गोष्टींसाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. या मोहिमेची तयारी सध्या आंध्रप्रदेशमधील श्रीहरिकोटा इथे युद्धपातळीवर सुरू असून GSLV-F10 या प्रक्षेपकाला प्रक्षेपणासाठी सज्ज करण्याचे काम केले जात आहे.

लॉकडाउनमुळे प्रक्षेपण मोहिमा स्थगित!

याआधी इस्त्रोने २८ फेब्रुवारीला एक उपग्रह प्रक्षेपण मोहिम फत्ते केली होती. त्यानंतर ५ मार्चचे याच EOS-03 उपग्रहाचे नियोजित प्रक्षेपण हे तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलले गेले होते. मात्र त्यानंतर कोरोनोच्या तिसऱ्या लाटेमुळे आणि पुन्हा जाहिर झालेल्या लॉकडाऊनमुळे इस्त्रोने उपग्रह प्रक्षेपण मोहिमा या स्थगित केल्या होत्या. यामुळे अनेक नियोजित उपग्रह प्रक्षेपण मोहिमा या लांबणीवर पडल्या आहेत. आता उपग्रह प्रक्षेपण मोहिमांचे वेळापत्रक पुन्हा किती लवकर सुरळीत होते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकीकडे उपग्रह मोहिमा सुरू होत असतांना बहुचर्चित ‘गगनयान’ मोहिम, ज्या माध्यमातून भारतीय अंतराळवीर स्वबळावर अवकाशात पाठवला जाणार आहे, या मोहिमेच्या तयारीला विलंब झाला आहे की नाही यावर अद्याप इस्त्रोने कोणतेही भाष्य केलेलं नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Isro to launch satellite eos 03 space program with gslv f10 pmw

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या