लोकसभा निवडणुकांमधे झालेल्या मोठ्या पराभवानंतर आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी पक्ष संघटनेतील पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवात काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळाल्या. या परभावाची नैतिक जबाबदारी सोनिया गांधी आणि राहुल यांनी निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्वीकारली. त्यामुळे हे दोन्ही नेते आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, निवडणुकांमधे झालेला पराभवाला कारणीभूत हा कोणी एक व्यक्ती नसून, ही जबाबदारी सर्व पक्षाची आहे. काँग्रेसकडून या पराभवाची योग्य प्रकारे विश्लेषण केले जाईल. चढ-उतार प्रत्येक निवडणुकांमधे होत असतात, त्यासाठी पक्षाच्या नेत्तृवाने राजीनामा देण्याची गरज नाही, अशी माहिती काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.