पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला नग्न करून त्याचं शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर त्याचा कथितपणे वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. हा विद्यार्थी विद्यापीठात येऊन अवघे चारच दिवस झाले होते. याप्रकरणी सुरुवातीला आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी रॅगिंग आणि लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर पोलीस तपास करण्यात आला आणि त्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एकूण १२ आरोपींना अटक केली आहे. यात विद्यापीठातील आजी आणि माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहाच्या खोली क्रमांक ७० मध्ये पीडित विद्यार्थ्याला जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बालकनीत त्याची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. अटक करण्यात आलेल्या १२ जणांपैकी काही आरोप पीडित विद्यार्थ्यांवर झालेल्या सर्व अत्याचारात सहभागी होते. याबाबत पोलिसांना काही पुरावेही मिळाले आहेत.

“पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप”

विशेष म्हणजे हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आरोपी विद्यार्थ्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये आरोपींनी रँगिंगचा भाग उघड होणार नाही यासाठी नियोजन केलं.

हेही वाचा : प्रत्येक विद्यार्थी रँचो, मुन्नाभाई नसतो, रॅगिंग पुन्हा बळी घेऊ लागलंय…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पोलिसांनी ९ ऑगस्टला घडलेल्या या घटनेबाबत तपास करताना वसतिगृहाच्या स्वयंपाक करणाऱ्याचीही चौकशी केली. याप्रकरणी विद्यापीठातील आणखी दोन विद्यार्थ्यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आलं आहे.