जेट एअरवेजची विमाने लवकरच विमानतळाच्या धावपट्टीवरून पुन्हा उड्डाण करताना दिसतील. कंपनीच्या मते, जेट एअरवेजची उड्डाणे २०२२ च्या पहिल्या आर्थिक तिमाहीपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करतील. तसेच सध्या परदेशी उड्डाणे केवळ कमी अंतराची असतील. एअरलाइनचे म्हणणे आहे की, ते फ्लाइट स्लॉट आणि इतर समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेटिंग फ्लाइटसाठी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

यूएईचे व्यापारी मुरारीलाल जालान हे लंडनस्थित जालान कॉर्लक कन्सोर्टियमचे अग्रणी सदस्य आणि प्रस्तावित जेट एअरवेजचे गैर-कार्यकारी सदस्य आहेत. जालान यांचे म्हणणे आहे की, “आम्ही तीन वर्षात ५० हून अधिक विमानांची  योजना आखत आहोत, जी ५ वर्षात १०० च्या वर पोहोचेल. समूहाकडे दीर्घकालीन व्यवसाय योजना देखील आहे.”

जालान म्हणाले की, “विमान उद्योगात हा इतिहास आहे की दोन वर्षांपूर्वी व्यवसाय बंद पडेलेल्या विमान कंपनीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. आम्ही या ऐतिहासिक उड्डाणात सहभागी होण्यास तयार आहोत.”

हेही वाचा- ‘इन्फोसिस’ विरुद्ध ‘पांचजन्य’ वादात निर्मला सीतारामन यांची उडी; म्हणाल्या, “ते वक्तव्य…”

कधी सुरु होईल विमानसेवा

कंपनीने सांगितले की जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान दिल्ली ते मुंबई दरम्यान त्यांचे पहिले उड्डाण सुरू होईल. कन्सोर्टियम यासाठी देशातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. या प्रक्रियेमध्ये विमानतळावरील स्लॉट वाटप, आवश्यक विमानतळ इन्फ्रा आणि नाईट पार्किंग इत्यादी बाबींचा समावेश आहे.

जेट एअरवेजचे कार्यकारी सीईओ कॅप्टन सुधीर गौर म्हणाले, “जेटचे नवीन मुख्यालय दिल्ली-गुरुग्राममध्ये असेल. जेटने सुमारे १५० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरीस आणखी १००० कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. आमचे पहिले उड्डाण दिल्ली ते मुंबई सुरु होईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्थिक तंगीमुळे थांबवली होती उड्डाणे 

आर्थिक तंगीमुळे जेटने १९ एप्रिल २०१९ पासून उड्डाणे थांबवली होती. करोनाच्या साथीनंतर देशातील विमान उद्योग संकटात आहे. लॉकडाऊन दरम्यान, विमानांचे उड्डाण बराच काळ बंद राहिले आणि नंतर हळूहळू मर्यादित संख्येने उड्डाणे सुरू करण्यात आली. परदेशी उड्डाणांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातल्यामुळे विमान कंपन्यांच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे.