अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सतत चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यांकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. नुकतंच त्यांनी एका मुलीला डेटिंगशी संबंधित एक सल्ला दिला आहे. यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बायडेन आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात, त्यातच आता या नव्या वक्तव्याची भर पडली आहे.

जो बायडेन शुक्रवारी कॅलिफोर्निया येथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. इर्विन व्हॅली कॉलेजमधील भाषणानंतर बायडेन एका मुलीसह सेल्फी काढण्यासाठी थांबले. यावेळी त्यांनी मुलीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला डेटिंगशी संबंधित सल्ला दिला. अनेकांनी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. न मागता मिळालेला हा सल्ला ऐकून ती मुलगीही गोंधळून गेली.

Viral Video : वडिलांना Swiggy मध्ये नोकरी लागल्यावर मुलीचा आनंद गगनात मावेना; केलं असं काही की…

या व्हिडीओमध्ये जो बायडेन त्या मुलीला म्हणत आहेत, “एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. ही गोष्ट मी माझ्या मुलीला आणि नातीलाही सांगितली आहे. तू ३० वर्षांची होईपर्यंत कोणत्याही गंभीर मुलाला डेट करू नको.” राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेल्या या सल्ल्याने ही मुलगीही गोंधळून गेली. ती म्हणते, “ठीक आहे. मी हे लक्षात ठेवेन.” यानंतर ती मुलगीही हसू लागते.

Work From Pub : ना घर, ना ऑफिस… आता थेट पबमधून करा काम! हॉटेल मालकांची कर्मचाऱ्यांसाठी खास ऑफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काहीजणांना या व्हिडीओमधील बायडेन यांची कृती आवडली नाही. यावरून त्यांनी बायडेन यांच्यावर टीकाही केली. मात्र, काही युजर्सनी त्याची प्रशंसा करत त्यांना ‘चांगला माणूस’ म्हटले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५.५ मिलिअनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून नेटकरी हा व्हिडीओ इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर करत आहेत.