दिल्लीतील मेस्ट्रो जनकपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असेलल्या महिला कॉन्स्टेबल सीमा ढाका यांनी ४२ दिवसांत २१ हरवलेल्या मुलांना शोधून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. यामध्ये काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलांपासून ते अगदी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलांचा समावेश आहे. सीमा यांच्या या धाडसी कामाचं त्यांच्या वरिष्ठांसह अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बँकॉक-कोलकाता विमानात प्रवाशांमध्ये हाणामारी

गेल्या दीड महिन्यात सीमा यांनी दिल्ली आणि इतर राज्यातील बेपत्ता झालेल्या २१ मुलांना शोधून काढले आहे. यादरम्यान त्यांनी बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि मेट्रोस्टेशनसह मुलं बेपत्ता झालेल्या परिसरातील दुकांनामध्ये चौकशी केली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी उत्तर प्रदेश आणि हरियाणात मोठ्या प्रमाणात छापे टाकले. तसेच त्यांनी मंदिरं आणि मशिदींमध्येही हरवलेल्या मुलांचा शोध घेतला. याकारवाई दरम्यान शोध लागलेल्या मुलांना संबंधीत पोलीस ठाण्यातील पथकाच्या मदतीने त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. यासाठी त्यांना ZipNET या वेबसाईटचीही मोठ्या प्रमाणात मदत झाली.

हेही वाचा – करोना रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; चीनसह सहा देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आता…

दरम्यान, “हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी सीमा यांनी केलेले सुक्ष्म नियोजन आणि प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं”, अशी प्रतिक्रिया मेस्ट्रो जनकपुरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. तसेच सीमा या सद्या अपरहणासाठी गुन्हेगारांनी वापरलेल्या पद्धतींचा अभ्यास करत असून त्यांची ही कारवाई यापुढे सुरू राहणार असल्याचेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lady police constable seema in delhi found 21 missing children in 42 days spb
First published on: 30-12-2022 at 13:51 IST