राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आज भारतात परत येणार आहेत. लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनीच ही माहिती ट्विट करून दिली आहे. तसंच रोहिणी यांनी एक खास आवाहनही केलं आहे. ११ फेब्रुवारीला बाबा सिंगापूरहून भारतात येत आहेत. बाबा आता बरे झाले आहेत, तुम्ही सगळ्यांनी बाबांची काळजी घ्या या आशयाचं ट्विट रोहिणी आचार्य यांनी केलं आहे.

५ डिसेंबर २०२२ ला किडनी ट्रान्सप्लांट

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
Maldives Minister Mariyam Shiuna
मालदीवच्या निलंबित मंत्र्याकडून भारतीय ध्वजाचा अपमान; तीव्र प्रतिक्रिया उमटताच मागितली माफी
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात

लालूप्रसाद यादव यांचं किडनी ट्रांसप्लांट ५ डिसेंबर २०२२ ला करण्यात आलं. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनीच आपले वडील लालूप्रसाद यादव यांना किडनी दान केली आहे. लालूप्रसाद यादव यांना सात मुली आहेत आणि दोन मुलं आहेत. यापैकी रोहिणी या दुसऱ्या क्रमांकाच्या कन्या आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या मुलीने हे सांगितलं होतं की मी मरणोत्तर अवयव दान केलं आहे. ऑर्गन डोनेशन करण्यात काहीही गैर नाही. माझ्या वडिलांना किडनीची गरज होती त्यामुळे मी त्यांना किडनी दान केली.

काय आहे रोहिणी आचार्य यांचं ट्विट?

तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आपले सगळ्यांचे आदरणीय नेते लालूप्रसाद यादव हे ११ तारखेला सिंगापूरहून भारतात परतत आहेत. मी मुलगी म्हणून माझं कर्तव्य पार पाडते आहे. माझ्या बाबांना चांगलं करून तुमच्याकडे पाठवते आहे आता त्यांची काळजी घ्या या आशयाचं एक ट्विट रोहिणी आचार्य यांनी केलं आहे. एवढंच नाही तर माझ्या वडिलांना जेव्हा भेटायला याल तेव्हा काळजी घ्या. चेहऱ्यावर मास्क जरूर लावा असं आवाहनही रोहिणी आचार्य यांनी केलं आहे.

रोहिणी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की आपण पाहतो की ह्युमन ट्रॅफिकिंग होतं. निष्पाप मुलं, मुली यांना मारलं जातं, त्यांचे अवयव काढले जातात, ते विकले जातात. या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्या थांबल्या पाहिजेत. दानाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं पाहिजे. दान करण्यापेक्षा मोठी गोष्ट काहीही नाही. तुम्ही कितीही शिका पण जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करू शकला नाहीत तर तुम्ही एक चांगले नागरिक कसे होणार? असंही त्या म्हणाल्या होत्या. आता लालूप्रसाद यादव किडनी ट्रान्सप्लांट नंतर पुन्हा एकदा भारतात परतत आहेत. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय होतील अशाही चर्चा आहेत.