“देशातून खोटेपणाचा कचराही साफ करायला हवा”; स्वच्छ भारत मिशनवरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

चीन सीमावादावरुन राहुल गांधींकडून पंतप्रधानांना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी. (संग्रहित छायाचित्र)

चीनकडून कथित सीमा उल्लंघन प्रकरणाचं वादळ काही काळ शांत झालेलं असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की, “आपल्याला आता खोटेपणाचा कचरा देखील देशातून साफ करायला हवा.”

पीएमओनं नुकतचं ट्विट करुन कचरामुक्त भारत मिशनमध्ये सामिल होण्याचे आवाहन जनतेला केले होते. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, “का नाही? आपल्याला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील खोटेपणाचा कचरा देखील साफ करायला हवा. यासाठी पंतप्रधान आता चीनने आपल्या जमिनीवर कब्ज केलाय की नाही ते सांगून हा सत्याग्रह सुरु करतील का?”

दरम्यान, चीनने केलेल्या सीमा कराराच्या उल्लंघनाबाबतचा संरक्षण खात्याच्या अहवालातील उल्लेख वगळल्याबद्दल राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “चीनच्या या कुरापतींचा उल्लेख वगळणं हा केवळ योगायोग नाही तर सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

“जेव्हाकेव्हा देश एखाद्या मुद्द्यावर भावनिक होतो तेव्हा फाईल्स गायब होतात. यामध्ये विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा राफेलची फाईल असो,” असंही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lets clean garbage of falsehood as well rahul gandhi attacks pm modi on swachh bharat mission aau

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या