मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नवीन सीईओच्या नावाची घोषणा केली आहे. लिंडा याक्करिनो या ट्विटरच्या नवीन सीईओ असणार आहेत. पुढील सहा आठवड्यात लिंडा याक्करिनो ट्विटरच्या सीईओ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्वीट करत याबाबतची घोषणा केली.

मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं,”मी ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याक्करिनो यांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे. लिंडा प्रामुख्याने व्यवसायिक संबंधित बाबींवर लक्ष केंद्रित करेल, तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेन. आताच्या प्लॉटफॉर्मचं रुपांतर ‘X’ (X/Twitter) मध्ये करण्यासाठी मी लिंडाबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर, ट्विटरच्या सीईओ पदाच्या शर्यतीत लिंडा याक्करिनोचं नाव आधीपासून चर्चेत होतं. लिंडा यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, २०११ मध्ये त्या ‘एनबीसी युनिव्हर्सल’बरोबर काम करत आहेत. सध्या त्या ‘ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग अँड पार्टनरशिप्स’ या कंपनीच्या चेअरपर्सन म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.