उत्तर प्रदेशातील लखीमपूऱ खेरी येथे ट्रक आणि बसमध्ये झालेल्या धडकेत १० लोकांचा मृत्यू झाला, तर ४१ लोक जखमी आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, १२ जणांना लखनऊमधील ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे. लखनऊच्या विभागीय आयुक्त रोशन जॅकब यांनी रुग्णालयात जखमींच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते.

रोशन जॅकब यांचा रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल झाला असून, यामध्ये त्या जखमी झालेल्या मुलाची चौकशी करत असून डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्यास सांगताना दिसत आहेत.

dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral

डॉक्टरांशी चर्चा करतानाही त्या सतत आपले डोळे पुसत होत्या. यावेळी त्यांनी वेदना सहन होत नसल्याने रडणाऱ्या मुलाला धीर देण्याचाही प्रयत्न केला.

जॅकब या २००४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. लखनऊमध्ये दोन आठवड्यांपूर्वी पाणी साचलेल्या रस्त्यांची पाहणी केल्याचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग ७३० वर हा अपघात झाला. लखनऊला निघालेल्या बसचा समोरुन येणाऱ्या ट्रकशी धडक होऊन हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनीदेखील अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मोदींनी दोन लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.