धक्कादायक! दिल्लीमध्ये लिव्ह इन पार्टनरचा खून, ४ दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला पंजाबमध्ये अटक | man murders live in partner in delhi arrested in punjab ludhiana | Loksatta

धक्कादायक! दिल्लीमध्ये लिव्ह इन पार्टनरचा खून, ४ दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला पंजाबमध्ये अटक

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या जोडीदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे.

धक्कादायक! दिल्लीमध्ये लिव्ह इन पार्टनरचा खून, ४ दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला पंजाबमध्ये अटक
सांकेतिक फोटो

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या जोडीदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. आरोपीचे नाव मनप्रित सिंग असून १ डिसेंबरपासून दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याला पंजबामधील पटियाला येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ४५ वर्षीय आरोपी मनप्रित सिंगने रेखा राणी या आपल्या जोडीदाराचा खून केला होता. १ डिसेंबर रोजी या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, या आरोपीला पटिलाया जिल्ह्यातील नाभा या त्याच्या मूळ गावी, अटक करण्यात आली आहे. खून केल्यानंतर आरोपी त्याची कार घेऊन दिल्लीमधून पळून गेला होता. अटक होऊ नये म्हणून तो लपून बसला होता.

हेही वाचा >> भाजपा नेत्याच्या शिवरायांवरील नव्या विधानानंतर संभाजीराजे संतापले; फडणवीसांचे नाव घेत म्हणाले “जमत नसेल तर…”

नेमका प्रकार काय?

दिल्लीमधील टिळक नगरमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार रेखा राणी यांना एक दहावी इयत्तेत शिकणारी एक मुलगी आहे. या मुलीने रेखा राणी यांच्या खुनाबद्दल सविस्तर सांगितले आहे. रेखा राणी यांच्या मुलीने माझी आई कोठे गेली आहे, अशी विचारणा केल्यानंतर मनप्रितने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर रेखा राणी यांची मुलगी तिच्या चुलत भावाकडे निघून गेली. हा सर्व प्रकार तिने आपल्या चुलत भावाला सांगितला. नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस रेखा राणी यांच्या घरी पोहोचेपर्यंत आरोपीने मनप्रितने पळ काढला होता. मागील काही दिवसांपासून मनप्रित आणि रेखा राणी यांच्यात पैशांवरून भांडण सुरू होते. मनप्रितने रेखा राणी यांना मारहाणदेखील केली होती.

हेही वाचा >> संभाजीराजेंचे राज्यपाल वक्तव्याप्रकरणी मोठे विधान, म्हणाले “जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा राणी यांच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. त्यांचा चेहरा आणि मानेवरदेखील अनेक जखमा होत्या. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 15:50 IST
Next Story
दुख:द! साईंच्या चरणी नमस्कार करण्यासाठी वाकला अन् हृदयविकाराचा झटका आला; तरुणाचा मृत्यू