“कलयुग अवतार, रामद्रोही…”; योगी आदित्यनाथांची विरोधकांवर जोरदार टीका

जे प्रभू रामाचे हितचिंतक नाहीत ते तुमचे हितचिंतक कधीच होऊ शकत नाहीत, असंही योगी म्हणाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवार, २३ ऑक्टोबर रोजी वाराणसी येथील मेहंदी गंज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या तयारीची पाहणी केली.

समाजवादी पक्ष हा आगामी विधानसभा निवडणुकीतला भाजपाचा मुख्य विरोधक असल्याचा उल्लेख उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. त्यासोबत त्यांनी महाभारताचा कलयुग अवतार असं म्हणत पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. अखिलेश सरकारमध्ये राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात दंगे झाले. अखिलेश यांच्या राज्यात हिंदूचा छळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा कुशीनगर इथल्या सभेत समाजवादी पक्षावर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आता आदित्यनाथ यांनीही टीका केली आहे.

उत्तरप्रदेशमधील विरोधी पक्ष भगवान रामाच्या विरोधात असल्याचा आरोप करत आदित्यनाथ म्हणाले की, अशा “राम-द्रोहींनी” केवळ श्रद्धेलाच हानी पोहोचवली नाही तर त्यांच्या सरकारच्या काळात सामाजिक जडणघडण बिघडले, विकासाला हानी पोहोचली आणि राज्याला दंगलीच्या आगीत ढकलले”. ते म्हणाले, “जे प्रभू रामाचे हितचिंतक नाहीत ते तुमचे हितचिंतक कधीच होऊ शकत नाहीत.”

ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

भाजपाने आयोजित केलेल्या विश्वकर्मा समाजाच्या सामाजिक पतिनिधी संमेलनाला संबोधित करताना, आदित्यनाथ म्हणाले, “दहशतवाद्यांचे संरक्षण करणार्‍या, दंगलखोरांना आलिंगन देणाऱ्या राम-द्रोहींपासून अंतर राखणे तुमच्या वर्तमानासाठी आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी चांगले ठरेल”.

समाजवादी पक्षाचे किंवा त्याच्या नेत्यांचे नाव न घेता, त्यांनी आरोप केला की २०१२-१७ दरम्यान, त्यांचे संपूर्ण कुटुंब लूट करण्यात गुंतले होते. “त्यांच्याकडे महाभारताचे सर्व संबंध होते – काका, आजोबा, पुतणे. त्या सर्वांनी मला महाभारतातील संबंधांची आठवण करुन दिली”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marking sp as rival no 1 yogi calls it kalyug avatar ram drohi vsk

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या