२२ एप्रिल या दिवशी काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा नाहक बळी गेला. या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं समोर आलं ज्यानंतर आता भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानचं टेन्शन निश्चितच वाढलं आहे अशात ७ मे रोजी देशभरात युद्ध सराव केला जाणार आहे. पाकिस्तानला उत्तर देण्यासाठीचीही ही तयारी आहे. पाकिस्तानला नेमकं काय उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
भारतातल्या २५९ ठिकाणी होणार मॉक ड्रील
अंदमान निकोबार येथील पोर्ट ब्लेअर
आंध्र प्रदेश- हैदराबाद, विशाखापट्टणम
अरुणाचल प्रदेश – अलॉग, इटानगर, तवांग, हायुलिंग, बोमदिला
आसाम- बोंगायगॉन, दिब्रुगढ, धुबरी, जोरहट, सिबसागर, तिनसुकिया, तेझपूर, दिगबोई, दिलाजान, गुवाहाटी, रंगिरा, नमारुप, नझिरा, नॉर्थ लक्ष्मीपूर, दरंग, गोलाघाट, करबी, कोकराझर
बिहार- बरुणी, कटिहार, पटणा, पूर्णिया, बेगुसराय
चंदीगढ-चंदीगढ
छत्तीसगढ- दुर्ग
दादरा नगर हवेली-दादरा (सिल्वासा)
दमण आणि दीव- दमण
दिल्ली -दिल्ली आणि दिल्ली कँटोनमेंट
गोवा-उत्तर गोवा, दक्षिण गोवा, वास्को
गुजरात- सुरत, वडोदरा, काकरापार, अहमदाबाद, जामनगर, गांधीनगर, भावनगर, कांदला, नालिया, अंकलेश्वर, ओखा, वडीनार, भरुच, दंगस, कच्छ, मेहसाणा, नर्मदा, नवसारी
हरियाणा-अंबाला, फरिदाबाद, गुडगाव, हिस्सर, पानिपत, पंचकुला, रोहतक, सिरसा, सोनपत, यमुनानगर, जझ्झर
हिमाचल प्रदेश-शिमला
जम्मू आणि काश्मीर-अनंतनाग, बडगाम, बारामुल्ला, डोडा, जम्मू, कारगील, कठुआ, कुपवाडा, लेह, पूँछ, राजौरी, श्रीनगर, उधमपूर, सांबा, अखनूर, उरी, नौशेरा, सुंदरबनी, अवंतीपूर, पुलवामा
झारखंड-बोकारो, गोमिओ, गोड्डा, साहेबगंज, जमशेदपूर, रांची
कर्नाटक-बंगळुरु, मल्लेश्वर, रायचूर
केरळ- कोचिन, थिरुवनंतपुरम
लक्षद्वीप-लक्षद्वीप
मध्य प्रदेश-भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, जबलपूर, कटणी
महाराष्ट्र – मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजी नगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मणिपूर-इंफाळ, चुराचंद्रपूर, उखरुल, मोरेह, खोंग
मेघालय-खासी हिल, शिलाँग, जतिना हिल, वेस्ट गॅरो हिल
मिझोराम-आयझॉल
नागालँड-दीमापूर, कोहिमा, मोकोकचूंग, मोन, फेक, ट्यूनसंग, वोखला, किफरी, पेरन्न,
ओदिशा-बालासोर, कोरापट, भुवनेश्वर, गोपालपूर, हिराकुंड, प्रदादीप, रोउरकला, भद्रक, देहेनकाल, जगतसिंगपूर, केंद्रापारा
पंजाब-अमृतसर, भटिंडा, फिरोझपूर, गुरुदासपूर, होशियारपूर, जालंदर, लुधियाना, पटियाला, पठाणकोट, अदनापूर, बारनला, भाक्रा नांगल, हलवारा, कोठकापूर, बाटला, मोहाली, अबोहार, फरिदपूर, रोपर, संगूर
राजस्थान- कोटा, रावत, अजमेर, अलवर, बारमेर, भरतपूर, बिकानेर, बुंदी, गंगानगर, हनुमानगढ, जयपूर, जैसलमेर, उदयपूर, सिकर, नाल, सुरतगढ, अबू रोड, अजमेर, भैरवी, जयपूर, नागपूर, जालोर, बेवार, लालगड, सवाई माधवपूर, पाली, भिलवाडा
सिक्कीम-गंगटोक
तामिळनाडू-चेन्नई
त्रिपुरा-आगरतळा
उत्तर प्रदेश-नरोरा, आग्रा, अलाहबाद, बरेली, गाझियाबाद, गोरखपूर, झांसी, कानपूर, लखनऊ, मथुरा, मेरठ, मुरादाबाद, सहराणपूर, वाराणसी, बक्षी का तालाब, मुगलसराय, सरस्वा, बागपत, मुझफ्फर नगर
उत्तराखंड-देहरादून
पश्चिम बंगाल-कूछबेहार, दार्जिलिंग, जलपैगुडी, मालदा, सिलिगुडी, ग्रेटर कोलकाता, दुर्गपूर, हलिदा, हाशिमारा, बुऱ्हाणपूर अशा ठिकाणी सराव करण्यात येणार आहे. कॅटेगरी १ मध्ये १३ ठिकाणी, कॅटेगरी २ मध्ये २०२१ ठिकाणी तर ३ मध्ये ४५ ठिकाणी हा युद्ध सराव केला जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना ७ मे रोजी नागरी संरक्षणासाठी ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच पाकिस्तानची कोंडी करण्याचे सगळे प्रयत्न सुरु आहेत.भारत कधीही हल्ला करु शकतो अशी वक्तव्यं पाकिस्तानच्या नेत्यांकडून केली जात आहेत.