देशात एकीकडे उष्णतेने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक भाग अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झाले आहेत. आसामच्या बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्ह्यासह शेजारच्या त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूरच्या काही भागांत रस्ते आणि रेल्वे संपर्क विस्कळीत झाला आहे.

मंगळवारी आसाम आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला असून भूस्खलनामुळे अनेक ठिकाणं प्रभावित झाली आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, भूस्खलनात एका महिलेसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे अनेक भागात भूस्खलन झाले आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये दोन लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे.

एकट्या कचार जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. अहवालात म्हटले आहे की, ४६ महसूल मंडळातील ६५२ गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. तर १६,६४५.६१ हेक्टर जमिनीवरील पीक पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.

आसाममध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी लष्करासह निमलष्करी दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, एसडीआरएफ, नागरी प्रशासन आणि प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. कचार जिल्हा प्रशासन आणि आसाम रायफल्स यांच्या संयुक्त उपक्रमाने बरखला भागातील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन दिवस या प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच हवामान खात्याने बुधवारी आसाममध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.