मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. …तर पाच वर्षात झोपा काढल्या का, जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८० जीआर काढले. याचा अर्थ या सरकारने गेल्या पाच वर्षात झोपा काढल्या, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील भाजपा सरकावर टीका केली आहे. वाचा सविस्तर..

२.हाफिज सईदला ‘ईडी’चा दणका, गुरुग्राममधील बंगला जप्त

लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. वाचा सविस्तर..

३. 23 मे रोजी जनतेची ‘मन की बात’ समोर येईल: शिवसेना

काश्मीरमध्ये शांतता व अयोध्येत राम मंदिर उभारू ही घोषणा 2014 मधील निवडणुकीत भाजपाला मोठे यश देऊन गेली. पण दोन्ही विषय 2019 सालात जिथल्या तिथेच असून या मुद्द्यांवर आता जनता प्रश्न विचारणार, तेव्हा त्याची उत्तरे देण्याची तयारी भाजपाने ठेवायला हवी, असे सांगत शिवसेनेने भाजपाला चिमटा काढला. वाचा सविस्तर..

४. हेअर ट्रान्सप्लांट बेतले जिवावर, मुंबईतील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबईतील साकीनाका येथील 43 वर्षीय व्यावसायिकाला हेअर ट्रान्सप्लांट करणे जिवावर बेतले आहे. वाचा सविस्तर..

५. स्वस्त वाहनाचा मोह महागात

संकेतस्थळावर स्वस्तात कार विक्रीची जाहिरात करून अनेकांना फसवणाऱ्या वितरकाविरोधात गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. वाचा सविस्तर..