Queen Elizabeth II Death : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर मुंबई डबेवाला असोशिएशनने दु:ख व्यक्त केले आहे. या असोशिएशनकडून ब्रिटनच्या महाराणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. महाराणी यांच्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या समाप्तीनंतर प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे राजे होणार आहेत. यावर मुंबईच्या डबेवाल्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर ‘ऑपरेशन युनिकॉर्न’ सुरू, वाचा अंत्यविधीचे नियोजन कसे असणार

“डबेवाल्यांचे मित्र चार्ल्स (प्रिन्स ऑफ वेल्स) हे आता राजे होणार आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलीप यांचे चार्ल्स हे थोरले पुत्र आहेत. त्यामुळे या सिंहासनावर बसण्याचा मान त्यांना मिळणार आहे. सिंहासनावर बसल्यानंतर त्यांना प्रिन्स चार्ल्स तिसरे म्हणून संबोधले जाईल”, असे डबेवाला असोशिएशनच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. अनेक वर्षांपूर्वी प्रिन्स चार्लस यांनी भारत भेटीदरम्यान मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेतली होती. चार्लस यांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या कामांचे कौतुक केले होते. त्यांच्या या भेटीनंतर मुंबईच्या डबेवाल्यांचा जगभरात नावलौकिक झाला होता. तेव्हापासूनच ब्रिटनच्या राजघराण्यासोबत मुंबईच्या डबेवाल्यांचे ऋणानुबंध कायम आहेत.

Queen Elizabeth’s Death: कोहिनूर मुकुटाचे काय होणार? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वयाच्या ९६ व्या वर्षी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला. बंकिंगहम पॅलेसने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. बऱ्याच काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. अखेर गुरुवारी स्कॉटलंडमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. महाराणी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. १९५२ सालापासून एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटनच्या महाराणीपदावर कार्यरत होत्या.