पीटीआय, कासरगोड

मोबाइल फोनचे व्यसन लागलेल्या मुलाला रागावल्यामुळे, मुलाने आईवरच प्राणघातक हल्ला केल्याची घटना केरळमध्ये घडली. यात गंभीर जखमी झालेली आई शनिवारी कन्नूर जिल्ह्यातील एका रुग्णालयात मरण पावली.

police officer died after being hit by a car while rushing to help the injured
जखमीच्या मदतीसाठी सरसावताना मोटारीने ठोकरल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
uncle rapes 18 Yr old niece in panvel
पनवेलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना! काकाचा पुतणीवर अत्याचार, आरोपीला अटक
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप

 कन्नूर जिल्ह्यातील केणिच्चिरा येथील सुजित नावाच्या तरुणाने गेल्या आठवडय़ात त्याची आई रुक्मिणी हिचे डोके घरातील भिंतीवर आपटल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर आठवडाभर रुग्णालयात उपचार सुरू होते. आरोपी सुजितला या गुन्ह्यानंतर लगेच अटक करण्यात आली होती.  चौकशीदरम्यान सुजितने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. सतत मोबाइल फोन वापरत असल्याबद्दल आईने रागावल्यामुळे आपण तिच्यावर हल्ला केला, असे त्याने सांगितले.