वॉलमार्टशिवाय अमेरिकेच्या पंधरा कंपन्यांचे लॉबिंग

अमेरिकेतील वॉलमार्ट या कंपनीने भारतात उद्योग वाढवण्यासाठी लॉबिंग केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अमेरिकेच्या किमान १५ कंपन्या व त्यांच्या उपकंपन्यांनी यावर्षी लॉबिंगवर लाखो डॉलर खर्च केले असल्याचे समजते.

अमेरिकेतील वॉलमार्ट या कंपनीने भारतात उद्योग वाढवण्यासाठी लॉबिंग केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अमेरिकेच्या किमान १५ कंपन्या व त्यांच्या उपकंपन्यांनी यावर्षी लॉबिंगवर लाखो डॉलर खर्च केले असल्याचे समजते.
ज्या अमेरिकी कंपन्यांनी भारतात उलाढाल वाढवण्यासाठी लॉबिंग केले त्यांच्यात औषध कंपनी पीफायजर, संगणक कंपनी डेल व एचपी, दूरसंचार कंपन्या क्वालकम व अलकाटेल-ल्युसेंट, आर्थिक सेवा कंपन्या मॉर्गन स्टॅन्ले व प्रुडेन्शियल फायनान्शियल, एरोस्पेस इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ अमेरिका, ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणारी कारगिल व कोलगेट पामोलिव्ह या कंपन्यांनी भारतात लॉबिंग केले असे अमेरिकी काँग्रेसच्या नोंदीत दिसून आले आहे.
फायनान्शियल एक्सिक्युटिव्ह इंटरनॅशनल, बिझीनेस राउंडटेबल, बिझीनेस सॉफ्टवेअर अलायन्स व फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस फोरम हे लॉबिंग करणारे गट आहेत. बोईग, एटी अँड टी, स्टारबक्स, लॉकहीड मार्टिन, एली लिली व जीई या कंपन्यांनीही भारतात उद्योग वाढवण्यासाठी लॉबिंग केले आहे.
अमेरिकी सिनेट व काँग्रेसला सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार फायनान्शियल एक्सिक्युटिव्ह इंटरनॅशनल, बिझीनेस राउंडटेबल, बिझीनेस सॉफ्टवेअर अलायन्स व फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस फोरम या कंपन्यांनी करनिर्धारण व अर्थ विधेयकातील तरतुदींसाठी लॉबिंग केले आहे. क्वालकॉम कंपनीने स्पेक्ट्रम परवान्यासाठी, अल्काटेल-ल्युसेंट कंपनीने अग्रक्रमाने बाजारपेठ प्रवेश, पीफायजरने सर्वोच्च न्यायालयाने जेनरिक औषधांच्या किमतीबाबत दिलेला निर्णय व पेटंट संदर्भात लॉबिंग केले. अलायन्स ऑफ अ‍ॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स या संस्थेनेही कार्बन उत्सर्जन प्रमाणाच्या मुद्दय़ावर तर प्रुडेन्शियल फायनान्सने भारतीय बाजारपेठेत प्रवेश व समभाग मालकीसाठी लॉबिंग केले.    
कंपनी                                             लॉबिंगवरचा खर्च
प्रुडेन्शियल फायनान्शियल                             ६० लाख डॉलर
मॉर्गन स्टॅन्ले                                       २० लाख डॉलर
बिझीनेस राउंडटेबल                                ६६ लाख डॉलर
अलायन्स ऑफ अ‍ॅटोबोमाबाईल मॅन्युफॅक्सर्स             ८० लाख डॉलर
डेल                                              २० लाख डॉलर
एचपी                                            १५ लाख डॉलर
कारगिल                                        १० लाख डॉलर
एरोस्पेस इंडस्ट्रीज असोसिएशन
ऑफ अमेरिका                                     २० लाख डॉलर
वॉलमार्ट                                         २.५  कोटी डॉलर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Not only walmart but 15 more american company involved in lobbying

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या