ओडिशामध्ये बालासोर इथं तीन रेल्वेगाड्यांचा अपघात भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २४० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे आणि ९०० प्रवाशी जखमी झाले आहेत. बहनागा स्टेशनजवळ झालेल्या या अपघातात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. या अपघातानंतर हृदय पिळवटून टाकणारे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत.

Odisha Train Accident Video: रेल्वे अपघातानंतर घटनास्थळी परिस्थिती काय? ड्रोन व्हिडीओ आला समोर

भीषण अपघातानंतर घटनास्थळावरील दृश्य पाहून कुणालाही डोळ्यांत अश्रू येतील अशी परिस्थिती आहे. या घटनेतील मृतांना ज्याठिकाणी ठेवण्यात आलंय, ते पाहिल्यावर अंगावर शहारे येतात. या शेकडो मृतदेहांमधून आपल्या मुलाचा मृतदेह शोधणाऱ्या एका वडिलाचा व्हिडीओ समोर आला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसने प्रवास करणारा मुलगा अपघातानंतर सापडत नव्हता. त्या मुलाला शोधताना त्याचे वडील दिसत आहेत. “माझा मुलगा कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये होता, त्याला शोधतोय. तो सापडत नाहीये. मी सुखगावचा आहे, पोलिसांशी बोललोय आणि माझ्या मुलाला शोधतोय पण तो सापडत नाहीये,” असं ते रडत रडत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून ट्विटर युजरही भावुक झाले आहेत. त्यांचा मुलगा मिळावा यासाठी प्रार्थना करतोय, असं काही युजर म्हणाले. तर, अनेकांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना या अपघातात गमावल्याचं दुःख व्यक्त केलं.