Chennai Coromandel Express Accident : ओडिशा दुर्घटनेप्रकरणी सातत्याने नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या अपघातात २८० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून हजारो प्रवासी जखमी झाले होते. या अपघातानंतर अनेकांचे मृतदेह छिन्नविछिन्न पसरले होते. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेहांचा खच लागला होता. यामध्ये ४० जणांच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओडिशामध्ये कोलमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्याती शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात २८० हून अधिक प्रवाशांचा जागीचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की रेल्वेचे डबे उडून इतरस्त्र पडले. त्यामुळे प्रवासीही बाहेर फेकले गेले. परिणामी, या प्रवाशांच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणाही होत्या. तर काही जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काही मृतदेहांची अवस्था तर ओळखण्यापलिकडे गेली होती. त्यामुळे अद्यापही अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नाही. असे असताना ४० मृतदेह असे सापडले आहेत ज्यांवर कोणत्याही प्रकारचा व्रण नाही की रक्ताचा साधा थेंब नाही. मग, असे असताना त्यांचा मृत्यू कसा झाला असेल? असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु, रेल्वे पोलिसांनी त्यांच्या मृत्यूमागचे कारणही शोधून काढले आहे. वीजेच्या धक्क्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे प्रकरण हाताळणाऱ्या पोलिसांनी ही बाब निदर्शनास आणली आहे.

हेही वाचा >> धक्कादायक! क्रिकेटच्या चेंडूला हात लावला म्हणून दलित तरुणाचा अंगठाच कापला, नेमकं प्रकरण वाचा

नेमकं कारण काय?

तिन्ही ट्रेन एकमेकांना आदळल्याने ओव्हरहेड वायर तुटल्या. या ओव्हरहेड वायरमधून सातत्याने वीजप्रवाह सुरू असतो. त्यामुळे या वायरचा संपर्क ट्रेनसोबत आला असावा. परिणामी याचा शॉक प्रवाशांना बसला असेल, म्हणून या ४० प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. “तिन्ही ट्रेन एकमेकांना आदळल्या तेव्हा ओव्हरहेड वायर्सही तुटल्या. यातून वीजेचा प्रवाह सुरू असल्याने प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असावा”, असं जीआरपीचे उपनिरिक्षक पप्पू कुमार यांनी त्यांच्या जबाबात नोंदवलं आहे.

“अपघातावेळी ओव्हरहेड वायर्सचा ट्रेनला स्पर्श झाल्याने प्रवाशांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे”, असं इस्ट कोस्ट रेल्वेच्या माजी वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालिका पूर्णा चंद्रा यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha train tragedy atleast 40 on coromandel express may have died due to eletrocution sgk
First published on: 06-06-2023 at 10:53 IST