छत्तीसगडमधील दबकोंटा जंगलात मंगळवारी शोधमोहीम राबवताना जवानांना एका नक्षलवादी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाशेजारी एक आयएएसएएस रायफल देखील मिळाली आहे. एसटीएफ आणि माओवाद्यांमध्ये या ठिकाणी चकमक झाली होती.
स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ), डिर्स्टिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी) आणि कोब्रा यांच्या संयुक्त पथकाने नक्षली लपलेल्या भागात आज पहाटे शोधमोहीम राबवली.
Chhattisgarh: One female Naxal was killed in an encounter with security forces near Dabbakonta area of Sukma. The body of the Naxal has also been recovered. The INSAS rifle recovered from her was looted from CRPF during Tadmetla attack in 2010.
— ANI (@ANI) July 9, 2019
यावेळी एसटीएफच्या पथकास घटनास्थळावरून नक्षलींचे अन्य काही सामानही हस्तगत करता आले आहे. जवानांनी आसपासच्या परिसरातही शोधमोहीम राबली, कारण चकमकीत दरम्यान किमान तीन नक्षली जखमी झाले असल्याची खात्री आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.