“राम मंदिराच्या घटनेचे आम्ही राजकारण करत नाहीत. आमचा जन्मही जेव्हा झाला नव्हता. आमचा पक्षही जेव्हा स्थापन झाला नव्हता. तेव्हाच हा विषय न्यायलयात निकाली काढला जाऊ शकत होता. तेव्हाच समस्या सुटली असती. भारताची फाळणी झाली, तेव्हाही काही गोष्टींची स्पष्टता आणून हा प्रश्न सोडविला जाऊ शकत होता. पण तो सोडवला गेला नाही. मतपेटीच्या राजकारणासाठी या विषयाचा शस्त्राप्रमाणे वापर केला गेला. यासाठी हा विषय मार्गी न लावता त्याला पुन्हा पुन्हा हवा दिली गेली. एवढेच नाही तर न्यायालयात यावर निर्णय होऊ नये, म्हणून अडचणी निर्माण केल्या गेल्या”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळी राम मंदिराच्या विषयावर होणाऱ्या वादाबाबत त्यांनी भाष्य केले. राम मंदिराच्या विषयावरून विरोधकांची मोठी अडचण झाली आहे. राम मंदिर झाल्यानंतर आता ते कुणाला घाबरवू शकत नाहीत. राम मंदिर झाल्यानंतर कुठेही आग लागली नाही.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “सोमनाथ मंदिरापासूनच्या पुढील सर्व घटना पाहा. भारताच्या मुळ पिंडाला त्यांच्याकडून विरोध करत आले आहेत. सोमनाथ मंदिराच्या वेळीही तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना जाऊ दिले नाही. प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण धुडकावून तुम्हाला काय मिळाले? तुमच्या सर्व जुन्या चुका बाजूला ठेवून घरी येऊन तुम्हाला निमंत्रण दिले, तरी तुम्ही त्याला फेटाळून लावले. यापेक्षा मोठी चूक काय असू शकते?”
“…तर सगळ्यांना पश्चाताप होईल”; निवडणूक रोख्यांवरुन पंतप्रधान मोदींचा विरोधकांना इशारा
विरोधकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण धुडकावले असले तरी मला जेव्हा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जायचे होते, त्याआधी मी बरीच तयारी केल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी मी काही संताशी चर्चा केली. वाचन केले, असे ते म्हणाले. अनेकांशी सल्लामसलत केल्यानंतर ११ दिवसांचे अनुष्ठान करण्याचा मी निर्णय घेतला होता. ते ११ दिवस मी जमिनीवर झोपलो. प्रभू राम ज्या ज्या ठिकाणी गेले होते, त्या त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
“पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
राम मंदिर सरकारी खजिन्यातून बनले नाही
राम मंदिर उभारण्यासाठी देशातील गोरगरिबांनी पै-पै जमा केली. या मंदिर निर्माणातून मी चार महत्त्वाच्या गोष्टींकडे पाहतो. एक म्हणजे ५०० वर्षांचा अविरत संघर्ष, दुसरे म्हणजे लांबलचक न्यायिक लढा, तिसरे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि चौथा म्हणजे लोकांनी एक एक पैसा गोळा करून हे मंदिर उभारले. यासाठी सरकारी खजिन्याचा वापर झालेला नाही. या गोष्टी पुढच्या कैक वर्षांपर्यंत लोकांना प्रेरणा देत राहतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.