नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी दिल्लीत येऊन दाखल झाल्यानंतर, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या उमेदवार निवडीला वेग आला आहे. यासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनी पवार यांची मंगळवारी संध्याकाळी दिल्लीतील निवासस्थानी भेट देऊन सविस्तर चर्चा केली. त्यांनी बुधवारी विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली असून त्यामध्ये काँग्रेसही सहभागी होणार आहे.

पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी दिवसभर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होत होत्या. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी पवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी संजय सिंह यांनी मुंबईत पवारांची भेट घेतली होती व सर्वसंमतीने पवारांच्या उमेदवारीला ‘आप’ पाठिंबा देईल असेही स्पष्ट केले होते.

bjp leader sanjay kshirsagar to join sharad pawar ncp
मोहोळमध्ये भाजपचे असंतुष्ट नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटात, शरद पवारांच्या उपस्थितीत  होणार पक्षप्रवेश
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
BJP youth leader in contact with Sharad Pawar group for candidacy from Raver
रावेरमधून उमेदवारीसाठी भाजपचा युवानेता शरद पवार गटाच्या गळाला?
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असतानाही तृणमूल काँग्रेसने वेगवान हालचाली करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, द्रमुक, आप, शिवसेना यांच्यासह अन्य प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहून दिल्लीमध्ये बुधवारी कॉन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेवर काँग्रेस, माकप, द्रमुक आदी पक्षांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे पक्ष बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याचे मानले जात होते. मात्र, काँग्रेसने ममतांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला काँग्रेसच्या वतीने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खरगे यांना अन्य पक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही बुधवारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार असून त्यापूर्वी विरोधकांमध्ये प्राथमिक सहमती घडवून आणण्याचे प्रयत्न पवार करत आहेत. त्यासाठीच त्यांनी सहा जनपथ या निवासस्थानी येचुरी व राजा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत येचुरी सहभागी होणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. विरोधकांचा सहमतीचा उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव सुचवण्यात आले असले तरी, पवारांनी हा पर्याय फेटाळला आहे. राष्ट्रपती पदासाठी पवार उभे राहण्यास तयार नसल्याने अन्य नावांचा विचार केला जात असून पवारांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या बैठकांमध्ये संभाव्य नावांची चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेसने पवारांच्या नावाला पाठिंबा दिला होता. मात्र, नितीश कुमार व गुलाम नबी आझाद यांच्या नावाचीही चर्चा केली जात आहे. त्यापैकी आझाद यांचे नाव काँग्रेसला मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे संभाव्य नावांवर खल केला जात आहे.

भाजपकडे २० हजार मतमूल्यांची कमतरता

राष्ट्रपती पदाचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपकडे सुमारे २० हजार मतमूल्यांची कमतरता असून बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांच्या मदतीने हा टप्पा पार करणे भाजपसाठी कठीण नाही. तरीही विरोधी पक्षांनी महाआघाडीचा सहमतीचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विरोधकांची २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी मानली जात आहे.