Mock Drills in India Live Updates : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना ७ मे रोजी नागरी संरक्षणासाठी ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच पाकिस्तानची कोंडी करण्याचे सगळे प्रयत्न सुरु आहेत.भारत कधीही हल्ला करु शकतो अशी वक्तव्यं पाकिस्तानच्या नेत्यांकडून केली जात आहेत. दरम्यान पुढे नेमकं काय होतं? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपली लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असणार आहे.

Live Updates

Pahalgam Attack Live Updates : ७ मे रोजी भारताचा युद्ध सराव, पाकिस्तानची धाकधूक वाढली; यासह महत्त्वाच्या घडामोडी

16:14 (IST) 6 May 2025

राहुल गांधींनी घेतली शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाची भेट, पोस्ट करत दिली माहिती.

राहुल गांधींनी पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. शहिदांच्या कुटुंबासह सगळा देश आहे, विरोधी पक्षांचं तुम्हाला पूर्ण समर्थन आहे. तुमच्या दुःखात मी सहभागी आहे असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

14:53 (IST) 6 May 2025

काश्मीरमध्ये हल्ला होईल याची माहिती मोदींना तीन दिवस आधीच होती-मल्लिकार्जुन खरगे

गुप्तचर यंत्रणांनी तीन दिवस आधीच हल्ला होईल अशी कल्पना दिली होती, मोदींना अहवाल दिला होता. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर दौरा रद्द केला होता. गुप्तचर यंत्रणांनी जर तुमच्या रक्षणासाठी हे सांगत असतील की तुम्ही काश्मीरला जाऊ नका. तर मग तुम्ही हीच बाब काश्मीर पोलीस, सीमा सुरक्षा दल या सगळ्यांना तुम्ही त्याची माहिती का दिली नाही हा माझा सवाल आहे असं मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलं आहे.

13:48 (IST) 6 May 2025

पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक

जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली.

12:40 (IST) 6 May 2025

भारतातल्या २५९ ठिकाणी ७ मे रोजी पार पडणार युद्ध सराव

भारतातल्या एकूण २५९ ठिकाणी ७ मे रोजी युद्ध सराव अर्थात मॉक ड्रील केलं जाईल. १९७१ नंतर पहिल्यांदाच देशभरात अशा प्रकारचं मॉक ड्रील केलं जातं आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, उरण, तारापूर, थळ, सिन्नर, मनमाड, नाशिक, रोहा, नागोठणे अशा १६ ठिकाणी मॉक ड्रील पार पडणार आहे.

10:54 (IST) 6 May 2025

"युद्धाचा पर्याय…", संयुक्त राष्ट्रप्रमुख अँटोनियो गुटेरस यांचं भारत-पाकिस्तान तणावावर सूचक विधान; म्हणाले…

Pakistan in UNSC Meeting: पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमवीर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली असून त्यात युद्धजन्य स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ...सविस्तर वाचा
10:17 (IST) 6 May 2025

भारतातील जनतेला युद्ध सराव वगैरे गोष्टींमधून मानसिक दृष्ट्या अडकवून ठेवलं जातं आहे-संजय राऊत

७ मे रोजी युद्ध सराव केला जाणार आहे त्याबाबत संजय राऊत म्हणाले की युद्ध सराव अनेक देशांमध्ये होत असतो. इस्रायलसारख्या देशांना सातत्याने युद्ध सराव करावा लागतो कारण तिथे वर्षानुवर्षे युद्धस्थिती आहे. युक्रेनचीही तशीच परिस्थिती आहे. १९७१ मध्ये बांगलादेशच्या युद्धाची परिस्थितीही आम्ही पाहिली आहे. भारत पाकिस्तान युद्धापेक्षा मोठं युद्ध आपण लढलो ते म्हणजे करोनाचं युद्ध. भारताची जनता मानसिक दृष्ट्या मजबूत आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही (केंद्र सरकारने) जनतेला मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवत आहात. खरंतर एखादी घटना घडल्यानंतर २४ तासांत उत्तर दिलं पाहिजे. आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे काय बंदुका वगैरे देणार का? भोंगे वाजणार, काळोख होईल, महत्त्वाच्या वास्तू झाकणे हे सगळं आम्ही १९७१ ला पाहिलं आहे. याची माहिती दिली जाऊ शकते. थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या तसं युद्ध सरावात काही दिवस घालवतील. सैन्य हे कायम सज्ज असलं पाहिजे, ते आहेच. असं राऊत यांनी म्हटलं आहे.

09:58 (IST) 6 May 2025

पाकिस्तानकडून १२ व्या रात्रीही गोळीबार, भारताने दिलं चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानने सलग १२ व्या रात्री नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला. पहलगाम हल्ल्यानंतर भारत कसं उत्तर देणार? याचा अंदाज येत नसल्याने पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. त्यामुळेच शस्त्रसंधीचं उल्लंघन करत विविध चौक्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. पाकिस्तानला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

08:59 (IST) 6 May 2025

७ मे रोजी भारताचा युद्ध सराव, पाकिस्तानची झोप उडाली

७ मे रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने मॉक ड्रील अर्थात युद्ध सराव करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारत कधीही एलओसीवर मिलिट्री स्ट्राईक करु शकतो असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

08:38 (IST) 6 May 2025

युद्ध झाल्यास पाकिस्तानचा विनाश, अमेरिकन एजन्सीचा दावा काय?

पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध अमेरिकन रेटिंग एजन्सी मूडीजचा एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. त्यात म्हटले आहे की जर भारत-पाकिस्तान तणाव आणखी वाढला तर त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर आणि परकीय चलन साठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे, भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा कोणताही मोठा परिणाम होणार नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

Pahalgam Terror Attack LUpdates in Marathi

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे लाईव्ह अपडेट्स| भारत पाकिस्तान युद्ध तणाव

७ मे रोजी भारताचा युद्ध सराव, पाकिस्तानची धाकधूक वाढली; यासह महत्त्वाच्या घडामोडी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना ७ मे रोजी नागरी संरक्षणासाठी ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.