नितीशकुमार यांची बिहारमधील जनता दल युनायटेड पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी करण्यात आलेली निवड पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी अवैध ठरवली. न्यायालयाच्या निर्णयामुळे नितीशकुमार यांना धक्का बसला आहे. नितीशकुमार बुधवारीच त्यांना समर्थन देणाऱया १३० आमदारांना घेऊन नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. तिथे ते या सर्व आमदारांसह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, या प्रकरणी बिहारचे राज्यपाल जोपर्यंत आपला निर्णय देत नाहीत, तोपर्यंत न्यायालयाचा निर्णय लागू राहिले, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
बहुमत आमच्याच पाठीशी!
जदयूचे नेते शरद यादव यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावून त्यामध्ये नितीशकुमार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली होती. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या एका समर्थक आमदाराने थेट पाटणा उच्च न्यायालयात धाव घेऊन नितीशकुमार यांची निवड अवैध ठरविण्याची मागणी केली होती. बिहारमधील जदयू पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी जीतन राम मांझी असून, केवळ त्यांनाच विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद यावेळी न्यायालयात करण्यात आला.
जीतन राम मांझी यांची पक्षातून हकालपट्टी