पेट्रोलच्या प्रति लिटर दरात २.३५ रु. तर डीझेलच्या प्रति लिटर दरात ५० पैशांची (स्थानिक कर वगळून) वाढ करण्याचा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शनिवारी घेतला. ही दरवाढ शनिवारी मध्यरात्रीपासूनच अमलात आली आहे. याखेरीज, केरोसिनच्या प्रति लिटर दरात दोन रुपये, एलपीजी गॅसच्या प्रति सिलिंडरमागे ५० रुपये तर डीझेलच्याच दरात प्रति लिटरमागे आणखी तीन ते पाच रुपयांची टांगती तलवार सामान्यांच्या डोक्यावर आहे. या वाढीमुळे मुंबईकरांना आता प्रति लिटरसाठी तब्बल ८१.५७ रु. मोजावे लागणार आहेत. तेल कंपन्यांना झालेला एक लाख ८० हजार कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी केरोसिन, स्वयंपाकाचा गॅस आणि डीझेलच्याही दरात आणखी वाढ करण्यासाठी वीरप्पा मोईली यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना साकडे घातले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2013 रोजी प्रकाशित
पेट्रोल, डीझेलचा पुन्हा भडका
आंतारष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाच्या घसरलेल्या मूल्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल, डिझेलच्या भडक्याला सामोरे जावे लागणार आहे.
First published on: 31-08-2013 at 08:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol price goes up by rs 2 35 a litre diesel by 50 paise