फिलिपाइन्स : बोट दुर्घटनेत १७१ बेपत्ता

प्रवाशांनी भरलेली फेरी बोट आणि मालवाहू जहाज यांची टक्कर होऊन फेरी बोट त्वरित बुडाल्याने १७१ जण बेपत्ता होण्याची घटना फिलिपाइन्समध्ये घडली आहे.

प्रवाशांनी भरलेली फेरी बोट आणि मालवाहू जहाज यांची टक्कर होऊन फेरी बोट त्वरित बुडाल्याने १७१ जण बेपत्ता होण्याची घटना फिलिपाइन्समध्ये घडली आहे. मात्र बेपत्ता झालेल्या प्रवाशांच्या शोधासाठी हाती घेण्यात आलेली मोहीम वादळी हवामानामुळे स्थगित करावी लागली आहे. या दुर्घटनेत अन्य ३१ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
सेंट थॉमस अ‍ॅक्विनस ही फेरी बोट ८३१ प्रवासी आणि खलाशांना घेऊन जात असताना ती सेबू बंदराजवळच्या समुद्रात मालवाहू जहाजावर आदळली. या घटनेची खबर मिळताच तटरक्षक दल आणि लष्कराच्या नौकांनी त्याचप्रमाणे स्थानिक मच्छीमारांनी ६२९ प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र खराब हवामानामुळे अन्य १७१ प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम स्थगित करावी लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Philippine 171 missing as two ships collide