भारतीय लोकशाहीचं मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ( २८ मे ) उद्घाटन केलं. नव्या संसद भवनाचे उद्घाटन वैदिक विधींनुसार झालं. यावेळी नव्या संसदेत सर्व धर्मीयांकडून प्रार्थना करण्यात आली. या माध्यमातून सर्वधर्मसमभावचा संदेश देण्यात आला. नवीन संसद ही वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

नव्या संसद भवनाचं उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ऐतिहासिक सेंगोलची पूजा केली. यावेळी पंतप्रधानांनी सेंगोलला साष्टांग नमस्कार केला. तसेच, उपस्थित साधू संताचे आशीर्वाद घेतले. यानंतर पंतप्रधान मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ सेंगोलची स्थापना केली. “संसद भवनात कामकाज सुरू होईल, तेव्हा सेंगोल आपल्याला प्रेरणा देईल,” असं पंतप्रधानांनी म्हटलं. पण, सेंगोलबाबत या पाच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? चला तर मग जाणून घेऊया…

Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
Loksatta explained The constructions of Pradhan Mantri Awas Yojana have not been completed
विश्लेषण: पंतप्रधान आवास योजनेची गती का मंदावली?
Ramdas Tadas sure about Prime Minister Narendra Modis meeting in Vardha
पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

हेही वाचा : ‘सेंगोल’ निर्मितीचे काम वुम्मीदी परिवाराकडे कसे आले? जाणून घ्या संसदेत स्थापित केल्या जाणाऱ्या राजदंडाचा ऐतिहासिक संदर्भ! 

  1. लोकसभा अध्यक्ष यांच्या खुर्चीजवळ स्थापन केलेल्या राजदंडाला ‘सेंगोल’ म्हटलं जातं. ज्याला तामिळमध्ये ‘सेम्मई’ म्हटलं जातं. याचा अर्थ सत्याला साथ देणारे.
  2. गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं होतं की, “सेंगोलने भारताच्या इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे.” ब्रिटीशांनी हा राजदंड भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडं सुपूर्द केला होता.
  3. १९४७ साली ब्रिटीशांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडं सेंगोल हा राजदंड सुपूर्द केल्यानंतर, त्यास उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील संग्रहालयात ठेवण्यात आलं होतं.
  4. नव्या संसद भवनाचं उद्घाटन होण्यापूर्वी तामिळनाडूच्या अधिनम संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत, संगोल सुपूर्द केलं होतं.
  5. सांगितलं जातं की, सेंगोल राजदंड ज्यांच्याकडं सुपूर्द करण्यात येतं, त्यांच्याकडून न्यायाची आणि निष्पक्षपाती सरकारची अपेक्षा केली जाते.