नवी दिल्ली :‘‘युक्रेन संघर्षांवर लष्करी मार्गाने कोणताही तोडगा निघू शकणार नाही. या संघर्षांमुळे युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्प धोक्यात आले आहेत. याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात,’’ अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केली. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या चर्चेत त्यांनी या संघर्षांवर संवादातून मार्ग काढण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली.

पंतप्रधान कार्यालयाने प्रसृत केलेल्या निवेदनानुसार, या दूरध्वनी संभाषणात मोदी व झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील संघर्षांवर चर्चा केली. हे युद्ध व तणाव लवकरात लवकर संपवण्याची गरज आहे. त्यासाठी संवाद व मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याची आवश्यकता असल्याचे मोदींनी या वेळी सांगितले.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!

युक्रेनने गेल्या आठवडय़ात रशियाने सार्वमत घेऊन ताबा मिळवलेल्या चारपैकी दोन प्रांतात लक्षणीय आगेकूच केली आहे. युक्रेनसह पाश्चात्त्य देशांनी व अमेरिकेने या युक्रेनच्या डोनेस्क, लुहान्स्क, खेरसन आणि झोपोरीझिया चार प्रांतांत रशियाने घेतलेले सार्वमत अवैध ठरवून नाकारले आहे. हे सार्वमत जबरदस्तीने घेतल्याने बेकायदेशीर आहे, असे युक्रेनचे म्हणणे आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाची राजधानी मॉस्कोच्या लाल चौकातील सोहळय़ात या प्रांतांचे विलीनीकरण जाहीर केले होते.

दरम्यान, युक्रेनच्या लष्कराने रशियाव्याप्त पूर्व युक्रेनमधील लायमनच्या मुख्य भागावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. रशियाने याला दुजोरा देत सांगितले, की युक्रेनच्या लष्कराचा वेढा पडू नये म्हणून आमच्या सैन्याने लायमनमधून माघार घेतली आहे.