भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आडवाणींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अडवानी यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे.
मोदींनी अडवाणी यांची भेट तर घेतलीचं पण त्यांनी याविषयी ट्विटदेखील केले आहे. ‘आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक असलेल्या अडवानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे. ज्ञान व चारित्र्यसंपन्नता असलेला मनुष्य म्हणून त्यांची ओळख आहे. मला त्यांच्याकडून वैयक्तिकदृष्ट्या खूप काही शिकावयास मिळाले आहे. ते एक उत्तम शिक्षक व नि:स्वार्थी सेवेचे सर्वोच्च उदाहरण आहेत,’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आडवाणी व मोदींमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे वृत्त होते. मात्र, मोदींनी अडवाणींच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीमुळे सर्व चर्चांना पूर्णविराम बसण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2015 रोजी प्रकाशित
लालकृष्ण अडवाणींना वाढदिवसानिमित्त मोदींच्या शुभेच्छा; निवासस्थानी घेतली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 08-11-2015 at 11:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi wishes lk advani on his birthday