एकतर्फी निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट असूनही सगळ्यांनाच गुरूवारी जाहीर होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर संसदेचा सेंट्रल हॉल नव्या राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. उद्याच्या समारंभासाठी सेंट्रल हॉलमध्ये नवीन कार्पेट टाकण्यात आले आहे. येत्या २५ तारखेला नवनिर्वाचित राष्ट्रपती आपल्या पदाच्या गोपनीयतेची शपथ घेतील. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांची दिनचर्या उद्यापासून बदलणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोविंद यांच्या विजयासाठी ‘होम हवन’

उद्या ११.३० वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर रामनाथ कोविंद विजयी ठरल्यास ते भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून विराजमान होतील. त्यानंतर सर्वप्रथम केंद्रीय सचिव पी. के. सिन्हा हे कोविंद यांची भेट घेतील. यावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीमही असेल. ही टीम रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर करण्यात येणाऱ्या भाषणाचा मसुदा तयार करण्यासाठी मदत करेल. त्यानंतर केंद्रीय सचिव राजीव मेहर्षी रामनाथ कोविंद यांना २५ तारखेला होणाऱ्या शपथग्रहण समारंभाची माहिती देतील. त्यानंतर लष्करी सचिव अनिल खोसला नवनिर्वाचित राष्ट्रपतींची भेट घेतील. या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीनंतर रामनाथ कोविंद त्यांच्या १० अकबर रोड येथील निवासस्थानी परततील. रामनाथ कोविंद सध्या याठिकाणी तात्पुरत्या कालावधीसाठी राहत आहेत. मात्र, उद्या राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी भारतीय लष्कराचे खास पथक तैनात केले जाईल. या पथकात राष्ट्रपतींच्या खास अंगरक्षकांचा समावेश असतो. जोपर्यंत नवे राष्ट्रपती त्यांच्या रायसीना हिल्स येथील निवासस्थानी जात नाहीत तोपर्यंत १० अकबर रोड येथे रामनाथ कोविंद यांच्यासाठी तात्पुरत्या सचिवालयही थाटण्यात येईल. या सचिवालयातील कर्मचारी उद्यापासूनच १० अकबर रोडवर कार्यरत असतील. याशिवाय, दिल्ली पोलिसांकडूनही या भागात विशेष सुरक्षा पुरवली जाईल.

थोरांची ओळख

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presidential election parliament central hall ready for ceremony how bjp ramnath kovind life going to change meira kumar
First published on: 19-07-2017 at 20:15 IST