टंडन समितीने काळ्या यादीत टाकलेल्या अभिमत विदयापीठांची पायाभूत सुविधा व शिक्षक संख्या तपासणी प्रत्यक्ष तेथे जाऊन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला दिले आहेत.
न्या. दीपक मिश्रा व विक्रमजित सेन यांनी छायाचित्रे व व्हिडिओचित्रीकरणाच्या माध्यमातून तपासणी करण्याची सूचना फेटाळून लावली व पात्रता ठरवताना असे चालणार नाही. तपासणी ही प्रत्यक्ष तेथे जाऊनच झाली पाहिजे. विद्यापीठ तपासणी करायची असेल तर ती प्रत्यक्ष करून काही दोष असल्यास ते विद्यापीठ अनुदान  आयोगाने विचारात घेणे आवश्यक आहे. तीन महिन्यात ४१ अभिमत विद्यापीठांची तपासणी करण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

prob on blacklisted deemed universities
blacklisted deemed universities, deemed universities, loksatta news, loksatta, marathi news, marathi   
अभिमत विद्यापीठांची तपासणी करण्याचे आदेश
पीटीआय, नवी दिल्ली