सीबीआयच्या स्थापना दिनी केंद्रीय यंत्रणांवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी ताशेरे ओढले आहेत. या यंत्रणांची व्याप्ती वाढल्याने या यंत्रणांनी आर्थिक गैरव्यवहार आणि देशविरोधी कारवाया असलेल्या प्रकरणांकडे सर्वाधिक लक्ष दिलं पाहिजे, असं चंद्रचूड म्हणाले. सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्त २० व्या डीपी कोहली मेमोरिअल व्याख्यानात ते बोलत होते.

चंद्रचूड म्हणाले, आज देशातील प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्ध आर्थिक गुन्ह्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. सीबीआयला भ्रष्टाचारविरोधी तपास यंत्रणांच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन विविध प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्यास सांगितले जात आहे. यामुळे सीबीआयवर आपल्या भूमिकेवर ठाम राहण्यास मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या मर्यादित व्याप्तीमुळे प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ अशा प्रकरणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, जे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत. राष्ट्राविरुद्धच्या आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित अशा बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणे अयोग्य आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांचे प्रकार बदलले आहेत. तंत्रज्ञानावर आधारित गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे बदललेल्या ट्रेंडमुळे आता यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.