आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस पक्षाचा कचरा त्यांच्या पक्षात घ्यायचा नाही, असे म्हटले आहे. काँग्रेसचा कचरा पक्षात घेण्यास सुरुवात केली, तर संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आम आदमी पक्षात सामील होतील असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या दौऱ्यावर असलेले अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पक्षातील काही लोक काँग्रेस पक्षात सामील झाल्याचे विचारल्यानंतर त्याबाबत भाष्य केले.

“प्रत्येक पक्षात असे घडते की, ज्यांना तिकीट मिळत नाही, ते नाराज होतात. त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जातो, काही लोक सहमत असतात तर काही नाराज होतात. काँग्रेसमधीलही अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, पण त्यांचा कचरा आम्हाला उचलायचा नाही, जर आम्ही त्यांचा कचरा उचलू लागलो, तर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आमच्या पक्षात येतील. ही स्पर्धा करायची झाली तर आपल्यापैकी फक्त २ जण त्या पक्षात गेले आहेत. मी त्यांना आव्हान देत आहे,२५ आमदार आणि २-३ खासदार आमच्या संपर्कात आहेत, त्यांना आपमध्ये यायचे आहे,” असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

पंजाबमध्ये त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, असे अरविंद केजरीवाल यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला जातो, निवडणूक पुन्हा वर जाते, ती पुन्हा खाली येऊ शकत नाही. जे पक्ष निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री घोषित करतात, ते निवडणूक जवळ आल्यावरच याची घोषणा करतात.”

“मागच्या वेळी आठवडाभरापूर्वी काँग्रेसने अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. आजपर्यंत काँग्रेस पक्षाने ना सिद्धूजींचे नाव घेतले आहे ना चन्नी साहेबांचे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण असतील हे माहीत नाही. उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे माहीत नाही. गोव्यात माहीत नाही, अजून कोणीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे बाकीच्या आधी आम्ही घोषणा करू,” असे केजरीवाल म्हणाले.