scorecardresearch

थंडी वाजत नाही का? म्हणणाऱ्यांना राहुल गांधींचे सणसणीत उत्तर; म्हणाले “माझ्या टीशर्टपेक्षा…”

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेची वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चा होत आहे.

थंडी वाजत नाही का? म्हणणाऱ्यांना राहुल गांधींचे सणसणीत उत्तर; म्हणाले “माझ्या टीशर्टपेक्षा…”

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेची वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चा होत आहे. या यात्रेत मागील काही दिवसांपासून सामाजिक, आर्थिक, कला क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या पांढऱ्या रंगच्या टीशर्टचही तेवढीच चर्चा रंगली आहे. देशभरात पारा घसरलेला असताना राहुल गांधी फक्त टीशर्ट परिधान करून यात्रेत चालतात. त्याना थंडी का वाजत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>> अहमदनगरच्या नामांतरावर MIMची भूमिका काय? असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “अरे तुम्ही…”

“मी या यात्रेदरम्यान टीशर्टवर चालत आहे. मात्र माझ्यासोबत अनेक गरीब शेतकरी, कामगार यांची मुलंदेखील चालत आहेत. त्यांच्या अंगात फाटलेले कपडे आहे. मात्र माध्यमं या मुलांच्या अंगातील फाटलेल्या कपड्यांबाबत विचारत नाहीत. सध्याच्या कडाक्याच्या थंडीत शेतकरी, कामगारांची मुलं कोणत्याही स्वेटर, जॅकेटविना का चालत असावेत असा प्रश्न माध्यमांकडून केला जात नाही,” अशी तक्रार राहुल गांधी यांनी केली.

“माझे टीशर्ट हा मुख्य मुद्दा नाही. मात्र या देशातील मुलं, शेतकरी, कामगार ऊबदार कपड्यांविना आहेत, हा मुख्य मुद्दा आहे,” असेही राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा >>>“निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर मी लक्ष्मण जगताप यांना फोन बंद करून ठेवायला सांगितलं होतं”, अजित पवारांनी संगितली ‘ती’ आठवण!

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाली भारत जोडो यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. या यात्रेदरम्यान कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी कोणत्याही उबदार कपड्यांविना फक्त पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर चालत आहेत. याच कारणामुळे राहुल गांधी यांना थंडी वाजत नाही का? कडाक्याच्या थंडीत फक्त पांढऱ्या टीशर्टवर ते कसे चालू शकतात? असे प्रश्न विचारले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 17:11 IST

संबंधित बातम्या