हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने अभिनेत्री कंगना रणौत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर कंगना रणौत या विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतीच त्यांनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी हे आईच्या महत्त्वाकांक्षेचा बळी पडलेला मुलगा असल्याचे कंगनाने म्हटले. तसेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांगा गांधीला राजकारणात उतरण्यासाठी भाग पाडले गेले, त्यांच्यावर दबाव टाकला गेला, असेही म्हटले.

कंगना रणौत म्हणाली, राहुल गांधी आईच्या महत्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा आहे. आपण ३ इडियट्स चित्रपटात पाहिले असेल की, मुलांना आपल्या पालकांच्या इच्छांसाठी बळी पडावे लागते. राहुल गांधी यांच्याबरोबरही असेच काहीसे झाले आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राजकारणात सक्रिय राहण्यासाठी आईकडून दबाव टाकलो जातो. याउलट त्या दोघांना त्यांचे जीवन जगण्याची मुभा द्यायला हवी होती.

‘इंग्रजी येत नव्हतं म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांना पंतप्रधान केलं नाही’, कंगनाचं वक्तव्य चर्चेत

राहुल गांधी यांचे वय ५० च्याही पुढे गेले आहे. तरीही त्यांना युवा नेता म्हणून वारंवार पुढे आणले जाते. मला वाटते त्यांच्यावर खूप दबाव आहे आणि ते एकटे पडलेले आहेत, असेही कंगना रणौत मुलाखतीत म्हणाली. तसेच गांधी कुटुंबाने त्यांच्या मुलांना इतर क्षेत्रात काम करू दिले पाहीजे होते. त्यांनी कदाचित अभिनय क्षेत्रातही काम करायला हरकत नव्हती, असेही कंगना यांनी सांगितले.

“आपल्या देशात पॉर्नस्टारला जितका आदर..”, सनी लिओनीचं नाव घेत कंगनाने केलं ‘त्या’ वक्तव्याचं समर्थन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी चांगले अभिनेते झाले असते

राहुल गांधी यांनी इतर क्षेत्रात काहीतरी करायला हवे होते, त्यांनी अभिनय क्षेत्रात हातपाय मारायला हरकत नव्हती. कदाचित ते चांगले अभिनेते झाले असते. त्यांची आई जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे. त्यांच्याकडे पैशांची कमतरता नव्हती. मी अशी अफवा ऐकली की, ते एका महिलेच्या प्रेमात होते, पण त्यांना तिच्याशी लग्न करता आले नाही, असा दावाही कंगना रणौतने मुलाखतीदरम्यान बोलताना केला.