Raja Raghuvandhi Honeymoon murder case : इंदोर येथील राजा रघुवंशी याची मेघालय येथे त्याची पत्नी आणि तिच्या सहकाऱ्यांनी मिळून हत्या केल्याची घटना घडली होती. या हत्या प्रकरणाची देशभरात चांगलीच चर्चा देखील झाली. दरम्यान आता राजा रघुवंशी याच्या मोठ्या भावाने सोमवारी या प्रकरणामध्ये मुख्य आरोपीं असलेल्या सोनमच्या कुटुंबियांचे नार्को- अॅनालिसीस केले जावे अशी मागणी केली आहे. याबरोबरच या हत्येमध्ये आणखी काहीजण सहभागी असल्याचा संशय देखील राजा रघुवंशीच्या कुटुंबियांनी केला आहे.
पोलिसांनी २९ वर्षीय राजा रघुवंशी याची गेल्या महिन्यात हत्या केल्या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्ये त्याची पत्नी सोनम तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांचा देखील समावेश आहे. आऱोपी सध्या मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि एसआयटी कडून या प्रकरणाची तपास केला जात आहे.
राजा रघुवंशीच्या तेराव्याच्या दिवशी त्याचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी म्हणाला की, “सोनम, तिचे पालक, भाऊ गोविंद आणि वहिनी यांची नार्को-अॅनालिसीस चाचणी करावी अशी आमची मागणी आहे.”
सोनमवर हनिमूनला गेले असताना राज कुशवाह आणि इतर तीन जणांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. तर या प्रकरणातील इतर तीन आरोपी, विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी हे सुरूवातीला भाडोत्री मारेकरी असल्याचा संशय होता, पण नंतर पोलिसांना ते कुशवाहाचे मित्र असल्याचे आढळून आले आहे.
विपिन रघुवंशी म्हणाला की , “हत्या प्रकरणाती एकामागून एक नवीन व्हिडीओ समोर येत आहेत. आम्हाला वाटते की माझ्या लहान भावाच्या हत्येमध्ये की आणखी लोकांचा सहभाग आहे.”
तसेच त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांचीही चौकशी केली जावी आणि त्यांनी हे व्हिडीओ आधी का पोस्ट केले नाहीत याची माहिती घ्यावी अशी मागणी देखील केली आहे. यातच त्याने मेघालय पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
असे असले तरी सोनमचा भाऊ गोविंद हा या विधीसाठी उपस्थित होता, यावर रघुवंशी कुटुंबियांनी त्याला निमंत्रण देण्यात आले नव्हते असे स्पष्ट केले.
“मी येथे माफी मागण्यासाठी आलो आहे. जर कोणी आमच्यावर संशय घेत असेल तर आम्ही चौकशीची करण्याची विनंती करत आहोत. आम्ही राजा रघुवंशी यांच्या कुटुंबियांबरोबर आहोत,” असे त्याने माध्यमांना सांगितले. गोविंद हा राजा रघुवंशी याच्या १३ जून रोजी उज्जैन येथे झालेल्या अंत्यविधीसाठी देखील उपस्थित होता.
नेमकं काय झालं?
लग्नाच्या काही दिवसांनंतर राजा आणि सोनम मेघालयातील खासी हिल्स जिल्ह्यातील सोहराला येथे गेले आणि २३ मे रोजी बेपत्ता झाले. त्यांचा शोध सुरू असताना २ जून एका दरीत राजा रघुवंशी याचा मृतदेह आढळला. त्यानंतर ९ जून रोजी पहाटे सोनम गुन्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे १,२०० किमी अंतरावर असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझिपूरमध्ये आढळली आणि त्यानंतर तिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.