Rajnath singh on BJP new presedent bihar assembly polls RSS and Prashant kishor : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय जनता पक्षाला पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष कधी मिळाणरा याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल असे त्यांनी सांगितले आहे. याबरोबरच पक्षात कोणताही मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाबद्दल वेगवेगळण्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान न्यूज१८ ला दिलेल्या एका मुलाखतीत राजनाथ सिंह म्हणाले, “बिहार विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला पुढील भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाबद्दल ऐकायला मिळेल. आमच्या पक्षात कोणताही वाद नाही.”
यावेळी राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) भूमिका देखील स्पष्ट केली आणि पक्षाच्या राजकीय निर्णयांवर त्याचा प्रभाव असल्याच्या चर्चाही फाटाळून लावल्या. ते म्हणाले, “आरएसएस कधीही भाजपाच्या राजकीय कामात हस्तक्षेप करत नाही. मी लहानपणापासूनच आरएसएसशी जोडलेला आहे . संघ हा देशभक्तीचा संस्कार देतो.”
भाजपाला मिळणार १२ वे अध्यक्ष
पुढील राष्ट्रीय अध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे १२ वे अध्यक्ष असणार आहेत. जेपी नड्डा पहिल्यांना २०१९ मध्ये कार्यवाहक अध्यक्ष बनले आणि त्यानंतर २०२० मध्ये अधिकृतपणे त्यांची निवड करण्यात आली. नुकतेच नड्डा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य आणि रसायने तसेच खते मंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे. तेव्हापासून पक्षाकडून राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध घेतला जात आहे.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी बिहारमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी यावेळी सत्ताधारी एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “जनतेच्या प्रतिक्रिया पाहून आम्हाला विश्वास आहे की आम्ही सरकार स्थापन करू आणि आम्हाला दोन तृतीयांश बहुमत मिळू शकते. नितीश कुमार मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत.”
प्रशांत किशोर यांच्याबद्दल काय म्हणाले राजनाथ सिंह?
बिहारच्या राजकारणात प्रशांत किशोर यांची एन्ट्री झाल्याबद्दल राजनाथ सिंह म्हणाले की किशोर यांचा पक्ष जन सुराज याला एकही जागा मिळणार नाही. ते म्हणाले की, “प्रशांत किशोर एक महत्त्व नसलेला फॅक्टर आहे आणि यावर जास्त विचार करण्याची काहीही आवश्यकता नाही. लोकांना माहिती आहे की कोण मते कापण्यासाठी लढत आहे आणि कोण सरकार स्थापन करण्यासाठी. किशोर यांच्या पक्ष कदाचित एकही जागा जिंकू शकणार नाही. “
