भारताचं पहिलं सी-२९५ टेक्निकल मिलिट्री एअरलिफ्ट विमान अधिकृतपणे भारतीय वायूदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या विमानांचं अनावरण केलं. ही विमानं याच महिन्यात स्पेनवरून भारतात आणण्यात आली आहेत. राजनाथ सिंह यांनी या विमानावर ‘स्वस्तिक’ आणि ‘ओम’ ही चिन्हं काढली. तसेच या विमानांची पूजा केली. टाटा अ‍ॅडव्हान्स्ड कंपनी अशा ४० विमानांची निर्मिती करणार आहे. कंपनीच्या गुजरातमधील वडोदरा येथील प्लान्टमध्ये ही विमानं तयार होतील.

स्पेनवरून मागवलेलं सी-२९५ विमान आग्रा एअरबेसवर तैनात केलं जाईल. तिथेच त्याचं प्रशिक्षण केंद्र बांधलं जाईल. हे विमान तैनात करण्यासाठी आग्रा एअरबेसची निर्मिती करण्यात आली आहे, कारण हा एअरबेस खास पॅराट्रूपर्ससाठी बांधण्यात आला आहे.

हे विमान शार्ट टेक-ऑफ आणि लँडिंग करू शकते. लँडिंगसाठी या विमानाला केवळ ६७० मीटर लांबीची धावपट्टी पुरेशी आहे. हे विमान लडाख, काश्मीरसारख्या डोंगराळ भागांमध्ये सुरक्षेच्या बाबतीत निर्णायक भूमिका बजावू शकतं. तसेच सी-२९५ हे विमान ताशी ४८० किलोमीटर इतक्या वेगाने उडू शकतं. त्याचबरोर सलग ११ तास उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता आहे.

दरम्यान, या विमानाचं अनावरण करण्यापूर्वी विमानाची पूजा करण्यात आली. त्यावर ओम आणि स्वस्तिक काढण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाची विधीवत पूजा केली, तसेच विमानाला एक धागादेखील बांधला, त्यामुळे सोशल मीडियावर राजनाथ सिंह ट्रोल होऊ लागले आहेत.

हे ही वाचा >> “काही अर्बन नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवतात, घोषणांपासून धोरणांपर्यंत…”, पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदू धर्मात स्वस्तिक शुभ मानलं जातं

सनातन धर्मात स्वस्तिक चिन्हाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. नकारात्मक ऊर्जा काढून टाकणाऱ्या, घरात आनंद आणि समृद्धीचा प्रवाह वाढवणाऱ्या या चिन्हाला भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. यामुळेच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी किंवा कोणताही सण साजरा करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह लावणं शुभ मानलं जातं.