अलिगड : काँग्रेसने स्वातंत्र्यापासून राम मंदिराचा प्रश्न रखडवला, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे स्वप्न पूर्ण केले, अशा शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.कल्याण सिंह यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  शहा म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांमध्ये भरपूर काम करून मागास वर्गाला व्यापकरीत्या सक्षम करून कल्याण सिंह यांच्या स्वप्नांना आकार दिला आहे’. कल्याण सिंह यांचा स्मृतिदिन भाजपतर्फे हिंदू गौरव दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपला २०२४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व ८० जागांवर विजय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन शहा यांनी केले.