मायक्रोब्लॉगिंग साईट असणाऱ्या Twitter ने सर्व वापरकर्ते आणि संस्थांच्या अकाऊंटवरून लीगसी व्हेरिफिकेशन अर्थात वापरकर्त्याच्या नावासमोरील ब्लू टिक (Blue Tick) हटवली आहे. जगभरातील लाखो प्रसिद्धी व्यक्तींना याचा फटका बसला आहे. यामध्ये अनेक मोठे राजकारणी आणि बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट, दीपिका पादूकोन , रणबीर सिंह अशा अनेक कलाकारांची ट्विटर ब्लू टिक हटवली आहे.

दुसरीकडे, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली यांच्या ट्विटर खात्यासमोरील व्हेरीफाईड ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे. जगप्रसिद्ध फूटबॉलपटू रोनाल्डोचे ट्विटरवर १०० दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. असं असूनही त्याच्या ट्विटर खात्याची ‘ब्लू टिक’ हटवली आहे. असं असलं तरी काही ट्विटरने अभिनेता विलियम शटनर , बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स, लेखक स्टीफन किंग यांच्या नावासमोरील ब्लू टिक मात्र कायम ठेवली आहे.

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
Children Fear
“बुवा आला…, पोलीस आले…”; अशी भीती तुम्हीही मुलांना घालता का? मुलांच्या ‘घाबरटपणा’मागे पालकच ठरतात जबाबदार!

हेही वाचा- Twitter Blue Tick: ट्विटरने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सचिन तेंडुलकर यांच्यासह ‘या’ मोठ्या कलाकारांचे ‘Blue Tick’ हटवले

ट्विटरचे मालक एलॉन मस्क हे स्वत: या तिघांच्या सब्स्क्रिप्शनचे पैसे देत आहेत. याबाबत एलॉन मस्क यांनी स्वत: खुलासा केला आहे. ट्विटरवरील ‘पोप बेस’ नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “एलॉन मस्क हे लेब्रॉन जेम्स आणि स्टीफन किंग सारख्या काही सेलिब्रिटींच्या ट्विटर ब्लू टिकसाठी वैयक्तिकरित्या पैसे देत आहेत.” यावर प्रतिक्रिया देताना मस्क म्हणाले, “मी फक्त विलियम शटनर , लेब्रॉन जेम्स आणि स्टीफन किंग यांच्या ट्विटर ब्लू टिकसाठी पैसे देतोय.”

या प्रतिक्रियेनंतर भाजपा खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांना सवाल विचारला आहे. “मी का? ब्लू टिक का काढली? मिस्टर मस्क” असं रवी किशन यांनी विचारलं आहे. रवी किशन यांचं हे ट्विट वेगानं व्हायरल होत आहे.