सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे . राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर केला जात असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं सांगत ट्वीटर आणि फेसबुकचा उल्लेख केला.

काँग्रेस पराभूत झालेल्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनाम्याचे आदेश; सोनिया गांधी यांचे संघटनात्मक बदलांचे संकेत

“मला अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आपली लोकशाही हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग वाढत आहे. फेसबुक, ट्वीटरसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून आपले नेते, पक्ष आणि त्यांच्या प्रॉक्सींकडून राजकीय कथानकांची मांडणी करण्याचं प्रमाण वाढत आहे,” असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होताच मोठी घडामोड; सिद्धू राजीनामा देत म्हणाले “काँग्रेस अध्यक्षांच्या…”

या सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना योग्य संधी देत नसल्याचं वारंवार समोर आल्याचंही त्यांनी सांगितलं. सत्ताधारी प्रस्थापितांच्या संगनमताने ज्या प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा इशारा सोनिया गांधींनी यावेळी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत काँग्रेस सदस्यांनी सोनिया गांधींना अध्यक्षपदी कायम राहण्याचं आवाहन केलं. सोनिया गांधींनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला असता काँग्रेस सदस्यांनी नाकारला.