मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन येत्या वर्षअखेर भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गुरुवारी दिली.
रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या डोभाल यांनी एका स्थानिक वाहिनीला याबाबत माहिती दिल्याचे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु यांची डोभाल यांनी गुरुवारी भेट घेतली. आयातशुल्कामुळे अमेरिकेबरोबर संबंध ताणले गेले असतानाच रशियाबरोबर संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही भेट झाली.
यावेळी पुतिन यांच्या संभाव्य भारत भेटीबाबत चर्चा झाली असली तरी त्याची तारीख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही.