Sana Yousuf Murder Case : पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील एका तरुण इन्फ्लुअन्सरची हत्या करण्यात आली. सना युसूफ असं तिचं नाव असून राहत्या घरी तिच्यावर गोळीबार करण्यात आला. अप्पर चित्रालमधील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर सना युसूफचे ४ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत, तिला भेटायला आलेल्या एका नातेवाईकाने तिच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

घटनेनंतर हल्लेखोर लगेचच घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे आणि ते पाकिस्तानमध्ये सर्रासपणे होणाऱ्या ऑनर किलिंगसह सर्व संभाव्य कारणांचा तपास करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गोळीबार करण्यापूर्वी संशयिताने सनासोबत तिच्या घराबाहेर संभाषण केले.

“संशयित व्यक्ती घरात घुसला, त्याने अनेक गोळ्या झाडल्या आणि पळून गेला”, असं पाकिस्तानी माध्यमांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं. सनाला दोन गोळ्या लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे, अनेकांनी सनाला न्याय मिळण्यासाठी मागणी केली आहे. #JusticeForSanaYousuf सारखे हॅशटॅग इंस्टाग्राम आणि X सारख्या प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करू लागले.

सनाचे व्हिडिओ कोणत्या स्वरुपाचे असतात?

सनाचे वडील सामाजिक कार्यकर्ते आहेत. सनाचे व्हिडिओ दैनंदिन जीवनशैली, चित्राल संस्कृती, महिला हक्क आणि शिक्षण यावरील जागरुकता यावर आधारित होते. या घटनेमुळे नोबेल पुरस्कार प्राप्त मलाला युसुफझाईबरोबर घडलेल्या घटनेची आठवण ताजी झाली. मलाला युसुफझाईने २०१२ मध्ये महिलांच्या शिक्षणाच्या अधिकारावर चर्चा केली होती. यमुळे पाकिस्तानात तालिबानने तिच्यावर गोळीबार केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहा महिन्यांपूर्वी पित्यानेच केली होती हत्या

टिकटॉकवर सर्वाधिक सक्रिय असते म्हणून एका पित्याने त्याच्या पोटच्या पोरीची हत्या केली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडली. हे कुटुंब अमेरिकेतून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते.