स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या महात्मा गांधी यांच्या हत्येचा खटला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेचा विषय आहे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेल्या पत्राच्या संदर्भामुळे. राजकमल प्रकाशनाच्या आणि लेखक अशोक कुमार पांडेय लिखित ‘सावरकर –काला पानी और उसके बाद’ या पुस्तकात सरदार पटेल यांनी नेहरूंना गांधींच्या हत्येचा कट विनायक दामोदर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं पत्र लिहिल्याचा दावा केला आहे.

या पुस्तकात म्हटलं आहे, “१९४६ नंतर राजकीय वनवासात असलेले सावरकर गांधी हत्येचा संशय त्यांच्यावर गेल्याने पुन्हा चर्चेत आले. डॉ. जगदीश चंद्र जैन नावाच्या एका व्यक्तीने गांधी हत्येच्या कटाबाबत मदनलाल धिंग्रा यांच्याकडून मिळालेली माहिती हत्येआधीच मुंबई प्रांताच्या तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांना दिली होती. यात सावरकरांच्या नावाचा समावेश होता. तेव्हा याकडे फारसं लक्ष देण्यात आलं नाही. मात्र, गांधी हत्येनंतर तपासासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी नागरवाला यांनी सर्वात आधी मुंबईतील सावरकर यांच्या घरावर छापा टाकला.”

Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा
history of ramleela maidan
रामलीला मैदान- जयप्रकाश नारायण यांचे इंदिरा गांधींविरोधात आंदोलन ते आप पक्षाच्या स्थापनेचे केंद्र
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

आणखी वाचा – चतु:सूत्र : गांधीजी समजून घेताना..

“तपास अधिकारी नागरवाला यांनी सावकरकरांनीच गांधी हत्येचा कट रचल्याचं म्हटलं”

“सावरकरांच्या घरावरील छाप्यात जवळपास १५० फाईल्स आणि १० हजार कागदपत्रे जप्त करण्यात आली. असं असलं तरी छाप्यानंतर सावरकरांना तात्काळ अटक करण्यात आलं नाही. कारण असं केल्यास मुंबई प्रांतात जाळपोळीच्या घटना होतील अशी भीती होती. खूप नंतर मालगावकरांसोबत बोलताना तपास अधिकारी नागरवाला यांनी सावकरकरांनीच गांधी हत्येचा कट रचल्याचं म्हटलं होतं. तसेच यावर शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास राहील असं म्हटलं,” असंही या पुस्तकात सांगण्यात आलंय.

आणखी वाचा – गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…

“गांधी हत्येसाठी दिल्लीत येण्याआधी गोडसे आणि आपटे सावरकरांना भेटले”

या पुस्तकात पुढे म्हटलं, “२७ फेब्रुवारी १९४८ रोजी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहिलं. यात ते म्हणाले की, साक्षीदारांनी दिलेल्या जबाबावरून सावरकरांच्या नेतृत्वात हिंदू महासभेच्या एका कट्टरतावादी गटाने गांधींजींच्या हत्येचा कट रचला आणि अंमलबजावणी केली आहे हे स्पष्ट होत आहे. कपूर आयोगाच्या अहवालात देखील सरकारी साक्षीदार दिगंबर भडगे याच्या जबाबाला दुजोरा देणारे आणि गांधी हत्येसाठी दिल्लीत येण्याआधी गोडसे आणि आपटे सावरकरांना भेटल्याचे पुरावे समोर आले होते.”

४ मार्च १९४८ रोजी विनायक दामोदर सावरकर यांचा सुरक्षारक्षक अप्पा रामचंद्र कासर यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली होती. याबाबतही पुस्तकात सांगितलं आहे. या जबाबातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे,

१. नथूराम गोडसे आणि नारायण आपटे नेहमी सावरकरांना भेटायला यायचे. सावरकरांनी त्यांना फाळणीच्या काळात महात्मा गांधी आणि काँग्रेसविरोधात प्रपोगंडा चालवण्याचा सल्ला दिला होता.

२. दिल्लीच्या अखिल भारतीय हिंदू संमेलनात ५ आणि ६ ऑगस्टला आपटे आणि गोडसे सावरकरांसोबतच विमानातून आले होते. तसेच ११ ऑगस्टला सोबतच परत गेले होते.

३. डिसेंबर १९४७ मध्ये दिगंबर भडगे सावरकरांना भेटण्यासाठी आला होता. तेव्हा त्याची भेट झाली नाही म्हणून तो पुन्हा ३ दिवसांनी आला आणि मग त्यांची चर्चा झाली. याच महिन्यात करकरे, आपटे आणि गोडसे सावरकरांना भेटायला २-३ वेळा आले.

आणखी वाचा – लोकसत्ता विश्लेषण : ‘गोडसे’ उदात्तीकरण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

४. १३ किंवा १४ जानेवारीला करकरे एका पंजाबी युवकासोबत सावरकरांना भेटायला आला. त्यांनी जवळपास १५-२० मिनिटे सावरकरांसोबत चर्चा केली. १५ किंवा १६ जानेवारीला आपटे आणि गोडसे रात्री साडेनऊ वाजता सावरकरांना भेटले आणि २३/२४ जानेवारीला सकाळी १० वाजता ते पुन्हा सावरकरांना भेटायला आले. त्यांची ही भेट अर्धातास चालली.