आयपीएलच्या मागील मोसमात स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीवेळी हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली जनहीत याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
माजी गृहसचिव व भाजप नेते आर.के.सिंह यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पी.सदाशिवम यांच्या खंडपीठाने शिंदे यांच्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर नाहीत. माध्यमांच्या बातम्यांनुसार त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. तसेच शिंदे यांच्याविरोधात पुरावे असल्यास ते प्रसिद्ध करावेत अशी विचारणाही न्यायालयाने यावेळी केली. सबळ पुराव्यांशिवाय त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2014 रोजी प्रकाशित
आयपीएल फिक्सिंग: सुशीलकुमार शिंदेंच्या विरोधातील याचिका फेटाळली
आयपीएलच्या मागील मोसमात स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीवेळी हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली जनहीत याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

First published on: 24-02-2014 at 06:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sc refuses to entertain pil against shinde