इंदौरच्या महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यूजीसीच्या हेल्पलाइनवर याबाबत तक्रार केली आहे. यूजीसीने या संपूर्ण प्रकरणाबाबत महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला माहिती दिली असून महाविद्यालयातील रॅगिंगविरोधी कमेटीने याप्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याची माहिती मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. संजय दीक्षित यांनी दिली.
विदर्भ दौऱ्यावरुन अनिल बोंडेंची अजित पवारांवर टीका; म्हणाले “हेच जर पश्चिम महाराष्ट्रात…”
प्रथम वर्षात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी रॅगिंगसंदर्भात युजीसीला मेल केला होता. या मेलमध्ये त्यांनी वरिष्ठ विद्यार्थ्यांवर गंभीर आरोप केले. काही वरिष्ठ विद्यार्थी आम्हाला सर्वांसमोर नाचायला लागवतात. कधी खाण्याचे पदार्थ मागतात. तसेच नीट अभ्यास करू देत नाहीत. आम्हाला वाचनालयातही जाता येत नाही, अशी तक्रार या विद्यार्थांनी केली होती. तसेच काही विद्यार्थी आम्हाला कॉलेज संपल्यानंतर त्यांच्या रुमवर बोलावतात. तिथे जाण्यास उशीर झाल्यास आम्हाला एकदुसऱ्याला मारायला सांगतात. सोबतच अनैसर्गिक शारीरिक संबंधही ठेवण्यासाठी आमच्यावर दबाव आणतात. आमच्यावर जबरदस्तीही करतात, असे या विद्यार्थांनी मेलमध्ये म्हटले होते.
गोवंडी स्थानकात रुळाला तडा, हार्बर लोकल वेळापत्रक विस्कळीत
विद्यार्थ्यांची तक्रार प्राप्त होताच युजीसीने महाविद्यालाच्या व्यवस्थापनास याची माहिती दिली. त्यानुसार महाविद्यालयातील रॅगिंगविरोधी कमेटीने याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. तसेच आरोपीविद्यार्थ्यांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. योगितागंज पोलीस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी महाविद्यालयाने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली त्यांचे जबाब नोंदवणेदेखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.