संपूर्ण जगात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. श्वसन यंत्रणेवर विषाणूंचा प्रभाव पडत असल्याने श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. त्यामुळे श्वसन यंत्रणेवरच नाही तर मेंदूवरही परिणाम होत आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. करोनामुळे ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांमध्ये ही बाब जास्त दिसून आली आहे. या रुग्णांमध्ये भ्रम निर्माण होणे, अचाकन मानसिक स्थिती बदलणे अशा समस्या समोर येत आहेत. ऑक्सिजनच्या कमतरेतमुळे मेंदुतील ग्रे मॅटर कमी झाल्यानं असं होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मेंदूचं सीटी स्कॅन केल्यानंतर ग्रे मॅटरची मोजणी करण्यात आली, त्यात ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे करोनाचा श्वसनावरच नाही तर मेंदूवरही परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. जॉर्जियातील एका विद्यापीठानं केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. ब्रेन स्ट्रोकच्या उपचारानंतरही इतका प्रभाव पडत नाही असंही तज्ज्ञांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्या रुग्णांमध्य ग्रे मॅटर वॉल्यूम कमी झाल्याचं दिसून आलं आहे. तर ज्या रुग्णांना ऑक्सिजन गरज भासली नाही. अशा रुग्णांमध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. ताप आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूतील फ्रंटल टेम्पोरल नेटवर्कवर परिणाम होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. “करोना झाल्यानंतर ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. अशा रुग्णांना मेंदूचा विकार होण्याचा धोका आहे”, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

जो बायडेन ५० कोटी फायझर लशी करणार दान; G-7 बैठकीत करतील घोषणा

ग्रे मॅटर म्हणजे काय?

ग्रे मॅटर आपल्या मेंदूतील नर्वस सिस्टमचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मसल्स कंट्रोल, स्पर्श जाणवणे, बघणे, ऐकणे, आठवण, आपल्या भावना, बोलणं, निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास या सारख्या गोष्टी अवलंबून असतात. आपल्या मेंदुचे चार भागात वाटे असतात. त्यातील पुढच्या भागाला फ्रन्टल लोब, मागच्या भागाला पेरिंटल लोब, कानाजवळच्या भागाला टेम्पोरल लोब आणि कानामागील भागाला ऑकिपिटल लोब संबोधलं जातं. ज्या करोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी झाली आहे. त्या रुग्णांच्या फ्रन्टल लोबमध्ये ग्रे मॅटर कमी झाल्याचं दिसून आलं आहे. तर ज्या लोकांना ताप आला आहे. अशा लोकांमद्ये टेम्पोरल लोबमध्ये ग्रे मॅटर कमी झाल्याचं दिसून आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Severe covid19 with oxygen therapy may reduction in gray matter volume in brain rmt
First published on: 10-06-2021 at 17:12 IST