scorecardresearch

विद्याचरण शुक्ल यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा, मात्र स्थिती चिंताजनकच

छत्तीसगढमधील बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कॉंग्रेसचे नेते विद्याचरण शुक्ल यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असली, तरी ते अजून चिंताजनक स्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

छत्तीसगढमधील बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कॉंग्रेसचे नेते विद्याचरण शुक्ल यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असली, तरी ते अजून चिंताजनक स्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शुक्ल यांच्यावर गुडगावमधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्ल यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणाही झालीये. तरीही अजूनही त्यांची स्थिती चिंताजनकच आहे, असे मेदांता रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. के. दुबे यांनी सांगितले. नक्षलवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या शुक्ल यांना रविवारी एअर ऍम्ब्युलन्सने गुडगावला हलविण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2013 at 02:28 IST

संबंधित बातम्या